जाहिरात
मराठी बातम्या / देश / UP Assembly election 2022: सर्वांत मोठा बदल! मुस्लीमबहुल मतदारसंघातही मोदी-योगींची घोडदौड

UP Assembly election 2022: सर्वांत मोठा बदल! मुस्लीमबहुल मतदारसंघातही मोदी-योगींची घोडदौड

UP Assembly election 2022: सर्वांत मोठा बदल! मुस्लीमबहुल मतदारसंघातही मोदी-योगींची घोडदौड

UP Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेशातल्या 403 पैकी 73 मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. तिथलं चित्र कसं आहे पाहा…

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 मार्च: देशाच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा ठरणारा आहे. कारण पाच राज्यांच्या निवडणुकीचा परिणाम पुढे होणाऱ्या लोकसभा आणि इतर विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. मोदींचा विजयी अश्वमेध उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात दुसऱ्यांना सत्तेवर येण्याच्या मार्गावर आहे. मोदी-योगी यांचं डबल इंजिन सरकार उत्तर प्रदेशात पुन्हा येणार हे मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या तासाभरातच स्पष्ट झालं. 403 जागांच्या या उत्तर प्रदेश विधानसभेत 202 जागा विजयासाठी आवश्यक आहेत. अद्याप मतमोजणी बाकी असली तरी भाजप 240 हून अधिक मतदारसंघांत आघाडीवर आहे. भाजपला गेल्या निवडणुकीत प्रथमच उत्तर प्रदेशात खणखणीत यश मिळालं.  योगी आदित्यनाथ सरकार गेल्या वेळच्या 312 पैकी किती जागा टिकवणार हा प्रश्न आहे. पण सुरुवातीच्या निकालांच्या कलानुसार भाजपचा Vote share सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघातही ‘योगी’राज उत्तर प्रदेशातलं राजकारणात प्रथमपासूनच जाती-पाती आणि धर्म हे मुद्दे वरचढ ठरले आहेत.  अयोध्येचं राम मंदिर हा अनेक वर्षं राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं. भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनेही या मुद्द्यांना वेळोवेळी महत्त्व दिलं होतं. मोदी लाटेतही उत्तर प्रदेशातील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये भाजपला फारशी आशा नव्हती. या वेळी मात्र चित्र पालटलं आहे. 73 मुस्लीमबहुल मतदारसंघांपैकी 46 मध्ये भाजप उत्तर प्रदेशातल्या 403 पैकी 73 मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. या भागातून भाजपला यापूर्वी फारशी संधी मिळालेली नव्हती. या वेळी मात्र या 73 पैकी 46 मतदारसंघांमध्येही भाजपच आघाडीवर आहे. वर्षानुवर्षं मुस्लीम मतं गृहित धरणाऱ्या काँग्रेसला या 73 पैकी एखाद्याच मतदारसंघाने हात दिला आहे. समाजवादी पार्टीलाही 73 पैकी फक्त 25 मतदारसंघात आघाडी मिळाली आहे.

    अद्याप संपूर्ण निकाल हाती आलेला नाही. पण या मुस्लीमबहुल मतदारसंघाच्या जोरावरच भाजप यंदाही मोठी मजल मारेल, असं चित्र आहे. एका टीव्हीचॅनेलवर चर्चा करताना भाजपच्या नेत्याने याचं श्रेय योगी-मोदींच्या विकासकामांना दिलेलं असलं, तरी यामध्ये महिला मतदारांचा वाटा मोठा असू शकतो, अशी आता चर्चा आहे. वास्तविक भाजपने एकाही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नव्हती. तरीही मुस्लीमबहुल मतदारसंघांतही भाजपला बहुमत मिळालं आहे. मुस्लीम महिलांची साथ मिळाली असा दावा भाजपने केला आहे. ट्रिपल तलाकसारख्या निर्णयाने मुस्लीम महिलांची साथ भाजपला मिळाल्याचा पक्षाचा दावा आहे. गोव्यात BJP-काँग्रेस काँटे की टक्कर’,आमदार फुटू नये म्हणून महाराष्ट्रात फिल्डिंग

    समाजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly election 2017)47 जागा मिळवल्या होत्या. आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सायकल थोडी  अधिक वेगाने आणि जोरात मुसंडी मारताना दिसली आहे. पण मोदी-योगींच्या घोडदौडीपुढे सायकलचा वेग कमी पडल्याचं चित्र आहे. बाकी विरोधक तर भाजपपुढे सपशेल आपटले होते. याही वेळी काँग्रेस आणि बसपची दयनीय अवस्था झाली आहे.

    उत्तर प्रदेशचा भार प्रियांका गांधींवर सोपवण्यात आला होता. असं असूनही ऐतिहासिक दारुण पराभवाला काँग्रेसला सामोरं जावं लागतं होतं. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत फक्त 7 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (BSP)जेमतेम 19 जागा जिंकल्या होत्या. या वेळी या दोन्ही पक्षांना प्रत्येकी किमान 5 जागाही मिळवता येणार नाहीत, असं सुरुवातीच्या कलानुसार दिसत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात