Goa Election Result 2022 Latest Update: भाजपच्या गोवा कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपने 5 जागा जिंकल्या असून 15 जागांवर आघाडीवर आहे. जागा कमी झाल्यास अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आपल्यासोबत असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, गोव्याच्या जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. आम्हाला 20 जागा किंवा 1-2 त्यापेक्षा अधिक जागा मिळतील. नागरिकांना पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. अपक्ष उमेदवार देखील आमच्यासोबत येत आहेत. मगोप देखील आमच्याबरोबर आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन आम्ही सरकार स्थापन करू.