Home /News /national /

माहेरी आलेल्या मुलीला घराबाहेर बोलावून घातल्या गोळ्या, 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

माहेरी आलेल्या मुलीला घराबाहेर बोलावून घातल्या गोळ्या, 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

एका विवाहित तरुणीला घराबाहेर बोलावून गोळ्या घालून ठार (Murder) केलं आहे.

  उत्तर प्रदेश, 20 नोव्हेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मऊ (Mau) जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळ धक्कादायक घटना घडली आहे. मुहम्मदाबाद गोहना कोतवाली परिसरातील देवसीपूर गावात एका तरुणानं गावातल्याच एका विवाहित तरुणीला घराबाहेर बोलावून गोळ्या घालून ठार (Murder)केलं आहे. यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत मुलीचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. दोघांच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुशील घुले यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. ही घटना मोहम्मदाबाद गोहाना येथील देवासीपूर गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवसीपूर गावातील रहिवासी सुधाकर (26) हा शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील सिवान येथील घुरा यांच्याजवळ घराजवळ गेला. काही वेळानं सुधाकर म्हणजेच घुरा यांची विवाहित मुलगी वंदना (20) हिचा मृतदेह घराबाहेर मृत अवस्थेत आढळून आला.

  हेही वाचा-  जो बायडेन रुग्णालयात भर्ती; 1 तास 25 मिनिटासाठी कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

   माहिती मिळताच सीओ राजकुमार आणि एसओ शैलेश सिंह पोलीस दलासह पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घातला आणि फॉरेन्सिंग टीमला घटनास्थळी पाचारण करून कसून तपास सुरू केला.
  पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदनाची आई तारा देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, सुधाकरनं आपल्या मुलीवर आधी गोळी झाडली. ज्यात तिचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडली. हेही वाचा-  कॉफी पिण्याचे फायदे-तोटे माहीत आहेत का? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष आले समोर
   वंदना काहीतरी कारण देऊन घराबाहेर पडली होती, त्याच दरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचे कारण समजू शकलं नाही, असे एसपींनी सांगितलं. त्याची पडताळणी केली जात आहे.
  6 महिन्यांपूर्वी झालं होतं मुलीचं लग्न गावप्रमुख वीरेंद्र यांनी सांगितलं की, आरोपी तरुण आणि मुलगी दोघेही एकाच गावचे रहिवासी आहेत. मुलीचे लग्न तिच्या कुटुंबीयांनी मे महिन्यात आझमगढच्या कमहरिया येथे केलं होतं. काही दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या माहेरी आली होती आणि आज अशी घटना घडली. पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर गावात सध्या शांतता पसरली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Crime news, Uttar pradesh news

  पुढील बातम्या