मराठी बातम्या /बातम्या /देश /Success Story: 'ती माझी नाही तर वडिलांची नोकरी...' बाबांच्या जागी काम करणाऱ्या मिन्नूने घडवला इतिहास, UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश

Success Story: 'ती माझी नाही तर वडिलांची नोकरी...' बाबांच्या जागी काम करणाऱ्या मिन्नूने घडवला इतिहास, UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश

विशेष कष्ट न घेता एखाद्याला सरकारी नोकरी मिळाली तर अनेकदा त्या व्यक्ती मिळालंय त्यात समाधानी राहून नोकरी करत राहण्याचा पर्यायच ती व्यक्ती निवडेल. केरळमधल्या मिन्नू पीएम नावाच्या मुलीने मात्र वेगळं काम करून दाखवलं आहे.

विशेष कष्ट न घेता एखाद्याला सरकारी नोकरी मिळाली तर अनेकदा त्या व्यक्ती मिळालंय त्यात समाधानी राहून नोकरी करत राहण्याचा पर्यायच ती व्यक्ती निवडेल. केरळमधल्या मिन्नू पीएम नावाच्या मुलीने मात्र वेगळं काम करून दाखवलं आहे.

विशेष कष्ट न घेता एखाद्याला सरकारी नोकरी मिळाली तर अनेकदा त्या व्यक्ती मिळालंय त्यात समाधानी राहून नोकरी करत राहण्याचा पर्यायच ती व्यक्ती निवडेल. केरळमधल्या मिन्नू पीएम नावाच्या मुलीने मात्र वेगळं काम करून दाखवलं आहे.

    करियावट्टम, 25 सप्टेंबर: विशेष कष्ट न घेता एखाद्याला सरकारी नोकरी मिळाली तर अनेकदा त्या व्यक्ती मिळालंय त्यात समाधानी राहून नोकरी करत राहण्याचा पर्यायच ती व्यक्ती निवडेल. केरळमधल्या मिन्नू पीएम नावाच्या मुलीने मात्र वेगळं काम करून दाखवलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात तिला क्लार्क म्हणून नोकरी मिळाली होती; मात्र अशा प्रकारे नोकरी मिळाली तरी तिला आपल्या उत्तुंग स्वप्नांचा विसर पडला नाही. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती कष्ट घेत राहिली आणि त्याचं फळ तिला मिळालं. काल (24 सप्टेंबर) जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात मिन्नूने राष्ट्रीय पातळीवर 150वा क्रमांक मिळवल्याचं समजलं आणि तेव्हा तिला आपल्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. दी न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    करियावट्टम इथल्या मिन्नू पीएम (who is Minnu PM) हिला 2012मध्ये अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात (police department) क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. कारण पोलीस खात्यात काम करणाऱ्या तिच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला होता. आयुष्यात काही मोठं साकारण्याचं स्वप्न तिनं आधीच बघितलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. तेव्हा ती बारावीत होती. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे अनुकंपा तत्त्वावर मिळालेली नोकरी करणं तिला भाग पडलं; पण सरकारी खात्यात सहज मिळालेल्या ह्या नोकरीला ती नोकरी मानतच नव्हती. 'ही माझी नाही तर माझ्या वडिलांची नोकरी आहे. ती मिळवण्यासाठी मला कुठलीच परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागलेलं नाही. म्हणून मला माझी नोकरी मिळवायची आहे,' असं तिचं म्हणणं होतं.

    हे वाचा-सहावीत असताना घडलेली घटना ठरली टर्निंग पॉइंट; बदललं IAS टॉपर शुभम कुमारचं आयुष्य

    काही तरी भव्यदिव्य करण्याचं स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. अखेर तिनं आपलं स्वप्न पूर्ण केलं. कठोर मेहनत, जिद्द, सातत्य, चिकाटी या बळावर तिने यशाला गवसणी घातली. मिन्नूच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख नेहमीच उत्कृष्ट होता. तिने केरळ विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे आणि तेव्हा ती विद्यापीठात दुसरी आली होती. तिने 2015 साली यूपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. दोन वर्षांनी मुख्य परीक्षेत ती उत्तीर्णही झाली; मात्र मुलाखतीत ती अयशस्वी झाली. अवघ्या 13 गुणांनी तिचं स्वप्न भंगलं; मात्र तिने हार मानली नाही. तिने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.

    30 वर्षीय मिन्नू सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. अभ्यासासाठीच्या समर्पणामुळेच आपल्याला हे यश मिळाल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय आयपीएस अधिकाऱ्यांनीही तिला मानसिक आधार आणि प्रेरणा दिली. माजी डीजीपी लोकनाथ बेहरा, एडीजीपी मनोज अब्राहम आणि मुख्यालयातल्या इतर आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्याला खूप मदत केल्याचं मिन्नूने सांगितलं. मिन्नूचे पती जॉशी डीजे इस्रोमध्ये कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा असून, तो दुसरीमध्ये शिकत आहे.

    हे वाचा-Big News :Civil Services Main 2020 Result: UPSC मुख्य परीक्षेच्या निकालाची घोषणा

    शुक्रवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण 761 यशस्वी उमेदवारांची यादी यूपीएससीकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेमध्ये बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीनं दुसरा, तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात 36वी, तर विनायक नरवदे देशात 37वा आला आहे. 95व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.

    First published:

    Tags: Upsc, Upsc exam