मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सहावीत असताना घडलेली घटना ठरली टर्निंग पॉइंट; एका निर्णयाने बदललं IAS Topper शुभम कुमारचं आयुष्य

सहावीत असताना घडलेली घटना ठरली टर्निंग पॉइंट; एका निर्णयाने बदललं IAS Topper शुभम कुमारचं आयुष्य

शुभम यांनी सांगितलं, 'यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो; पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊनच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही.

शुभम यांनी सांगितलं, 'यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो; पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊनच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही.

शुभम यांनी सांगितलं, 'यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो; पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊनच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही.

पाटणा 25 सप्टेंबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2020 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा (IAS Result) निकाल काल (24 सप्टेंबर) जाहीर झाला. या वेळी यूपीएससीने 761 यशस्वी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. बिहारमधल्या (Bihar) कटिहार (Katihar) इथले शुभम कुमार (IAS Topper Shubham Kumar) या परीक्षेत देशात सर्वप्रथम आले आहेत. त्यांनी केवळ त्यांच्या जिल्ह्याचीच नव्हे, तर संपूर्ण बिहार राज्याचीच मान उंचावली आहे. नेमक्या कोणत्या घटनेमुळे शुभम यांच्या आयुष्यात बदल घडून आला, हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचीच माहिती आज न्यूज 18 तुम्हाला करून देणार आहे.

परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर न्यूज 18 ने शुभम यांच्याशी संवाद साधला. त्या मुलाखतीतून त्यांच्या यशाची रहस्यं उलगडली. ते सहाव्या इयत्तेत शिकत असताना अशी एक घटना घडली होती, की त्यामुळे त्यांनी कटिहार सोडून पाटणा (Patana) इथे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. शुभम यांनी सांगितलं, 'मी सहावीत असताना एका प्रश्नाचं उत्तर मी योग्य दिलं होतं; मात्र माझं उत्तर चूक असल्याचं एका शिक्षकांनी सांगितलं होतं. माझं उत्तर योग्य असल्याची मला खात्री आणि विश्वास होता. शिक्षकांच्या या कृत्यामुळे मी दुःखी झालो आणि माझा मूड बदलला. तेव्हा मी शिक्षणासाठी पाटण्याला जायचा निर्णय घेतला. मला पाटण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, असं मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. त्यांनीही मला विरोध केला नाही. तेव्हाच माझ्या आयुष्याला वळण मिळालं. माझं पुढचं शिक्षण पाटणा आणि बाकीच्या शहरांत झालं. त्याचीच परिणती म्हणून मला आज हे यश मिळालं आहे.'

धक्कादायक! WFH कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन कामासाठी घातक; Microsoftचा खुलासा

शुभम यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं, 'यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो; पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊन किंवा एखाद्या विशिष्ट (Coaching Class) कोचिंग क्लासमध्ये गेलं, तरच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही. या परीक्षेची तयारी कोणीही विद्यार्थी कुठेही करू शकतो. फक्त त्या विद्यार्थ्याचं अभ्यासाप्रति डेडिकेशन (Dedicated Study) अर्थात समर्पण असलं पाहिजे. आता तर डिजिटल माध्यमांचा जमाना आहे. ऑनलाइन वेबसाइट्स किंवा यू-ट्यूबवर एकापेक्षा एक सरस स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. त्यांच्या साह्याने विद्यार्थी तयारी करू शकतात. कोणाला असं वाटत असेल, की ते बिहारमध्ये तयारी करू शकत नाहीत, तर तसं अजिबात नाही हे लक्षात घ्यावं. विद्यार्थी कोणतंही शहर किंवा गावात राहूनही परीक्षेची तयारी करू शकतात. तसंच गेल्या काही वर्षांत या परीक्षेत बिहारच्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली होत आहे. इथले अनेक विद्यार्थी परीक्षेत यश मिळवत आहेत.'

आपण परीक्षेची तयारी कशी केली, याबद्दलही शुभम (UPSC Topper Shubham Kumar) यांनी माहिती दिली. ते दर दिवशी सात ते आठ तास अभ्यास करत असत. अशा प्रकारे त्यांनी सुमारे तीन वर्षं अभ्यास केला. तेव्हा त्यांना हे यश मिळालं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली किंवा ऑनलाइन स्टडी मटेरियल वापरलं, तरी त्यांना सर्वांत जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं ते स्वयंअभ्यासावर अर्थात (Self Study) सेल्फ स्टडीवर, असं शुभम सांगतात. विद्यार्थ्यांना विषयाचं आकलन चांगल्या प्रकारे झालं आणि उत्तम मार्गदर्शनाच्या साह्याने त्यांनी तयारी केली, तर यश नक्की मिळतं, असंही त्यांनी सांगितलं.

ECHS Mumbai Recruitment: आठवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 16,800 रुपये पगार

सध्या मसूरीत प्रशिक्षण घेत असलेल्या शुभम यांनी केडरच्या निवडीबद्दल सांगितलं, की त्यांनी पसंती बिहार केडरलाच (Bihar Cadre) आहे, तर दुसरी पसंती मध्य प्रदेशला आहे. शुभम कुमार यांनी 2019च्या परीक्षेत 290वी रँक मिळवली होती. 2020च्या या परीक्षेत मात्र त्यांनी देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण बिहारची मान अभिमानाने उंचावली आहे. आयपीएसपेक्षा आयएएसला प्राधान्य दिलं. कारण हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं आहे आणि हे काम करताना चांगल्या प्रकारे एंजॉय करता येईल, असं शुभम म्हणाले.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातली 70 टक्के लोकसंख्या शेतीवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे. त्यामुळे गावांच्या विकासावर आपला भर असेल, असं शुभम यांनी सांगितलं. कटिहारमधल्या ग्रामीण भागात आपलं बालपण गेलेलं असल्यामुळे ग्रामीण भागाच्या परिस्थितीची आपल्याला कल्पना असल्याचं ते सांगतात. त्यांच्या भागात जवळपास प्रत्येक वर्षी पूर येतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत होतं. म्हणून आपण पूरस्थिती सुधारण्याच्या अनुषंगाने काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

'मी ग्रामीण भागातला असल्यामुळे यूपीएससीच्या इंटरव्ह्यूतही मला ग्रामीण विकासासाठी काय करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता,' असं त्यांनी सांगितलं.

यूपीएससीमध्ये टॉपर ठरलेल्या शुभम यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिक्षक, मित्र, नातेवाईक यांच्यासह सर्व स्तरांतल्या मंडळींकडून शुभेच्छांचे फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. साहजिकच बिहारमधून येणाऱ्या शुभेच्छांचं प्रमाण जास्त आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यासह अन्य मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही शुभम यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे. न्यूज 18कडूनही शुभम यांना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.

First published:

Tags: Ias officer, Success story