Home /News /career /

Civil Services Main 2020 Result: UPSC मुख्य परीक्षेच्या निकालाची घोषणा, कोणी मारली बाजी?

Civil Services Main 2020 Result: UPSC मुख्य परीक्षेच्या निकालाची घोषणा, कोणी मारली बाजी?

UPSC Final Result 2020 : यूपीएससीकडून दिलेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 545 पुरुष आणि 216 महिला आहेत.

  UPSC Final Result 2020 : नवी दिल्ली, 24 सप्टेंबर :  केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) 2020 झालेल्या सिव्हील सेवाच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित केलं आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. शुभम कुमार नावाच्या उमेदवाराने परीक्षेच पहिला क्रमांक पटकावला आहे. (Civil Services Main 2020 Result:)ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते static.pib.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करून आपला निकाल पाहू शकतात. यूपीएससीकडून दिलेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. हा निकाल सिव्हील सेवा 2020 च्या परीक्षेचा आहे. (IPS AND IAS Officer) यूपीएससीने एकूण 761 उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव दिला आहे. 761 पैकी 263 उमेदवार जनरल श्रेणीतील आहेत. 86 उमेदवार EWS श्रेणीतून आहेत, तर 229 ओबीसी, 122 उमेदवार एससी विभागातील आहे, एसटीमधील 61 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. (UPSC Final Result 2020 Announcement of UPSC Main Exam Results) हे ही वाचा-शेतमजूर मुलाला IAS अधिकाऱ्याचा मदतीचा हात; आज प्रसिद्ध कॉलेजमध्ये घेतोय शिक्षण
  हे आहेत सिव्हील सर्विस 2020 चे टॉप 101- शुभम कुमार 2-जागृती अवस्थी 3-अंकिता जैन 4-यश जालूका 5-ममता यादव 6-मीरा के 7-प्रवीण कुमार 8-जीवानी कार्तिक नागजीभाई 9-अपला मिश्रा 10-सत्यम गांधी बार्टीचे 9 विद्यार्थी यावर्षी यूपीएससीत यशस्वी!
  लॉकडाऊनमधील ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी भावी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व करावे तेवढे कौतुक थोडेच आहे! तुम्हा सर्वांचा गर्व वाटतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या यूपीएससीत यश मिळवलेल्या 9 विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हे 9 जण भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Exam result, Ias officer, IPS Officer, Upsc, Upsc exam

  पुढील बातम्या