Home /News /national /

महिला आयोगाच्या अध्यक्षाच मोबाइलवर घसरल्या; 'मुली पळून जातात कारण...' वक्तव्यावरून नवा वाद

महिला आयोगाच्या अध्यक्षाच मोबाइलवर घसरल्या; 'मुली पळून जातात कारण...' वक्तव्यावरून नवा वाद

महिला आयोगाच्या अध्यक्षांची मुक्ताफळं: 'मुली मोबाइलवर बोलत राहतात. प्रकरण वाढतं आणि त्या लग्नासाठी मुलाबरोबर पळून जातात. तोपर्यंत आपलं त्याकडे लक्ष नसते. मुलींंना मोबाईल देऊच नका'

    लखनऊ, 10 जून : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये (Crime against Women) सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महिला अत्याचार हा समाजातील एक गंभीर विषय आहे. महिलांचा अनेक ठिकाणी छळ झाल्याच्या घटना समोर येत असतात. याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसाठी त्यांच्याकडील मोबाइलला जबाबदार धरलं आहे. उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी (UP Women commission chairman Meena kumari) यांनी महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसाठी त्यांच्याकडील मोबाइलला जबाबदार धरलं आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांमध्ये मोबाइलदेखील कुठेतरी कारणीभूत ठरत आहे. मीना कुमारी यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. कुमारी (Meena Kumari up mahila ayog) या उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. मीना कुमारी काय म्हणाल्या? बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत विचारले असता मीना कुमारी म्हणाल्या, "मुलींवरील गुन्हे समाजात थांबत नाहीत, ही चिंताजनक गोष्ट आहे. यासाठी आपल्याला समाजाबरोबरच आपल्या मुलींकडे देखील पाहावे लागेल. आजकाल मुली कोठे जातात, काय करतात, कोणत्या मुलांबरोबर त्या एकत्र असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मोबाईलकडे बघावे लागेल. मी नेहमी लोकांना सांगत असते की, मुली मोबाइलवर बोलत राहतात आणि हा प्रकार इथे पोहचतो की, त्या लग्नासाठी मुलाबरोबर पळून जातात. तोपर्यंत आपलं त्याकडे लक्ष नसते. कोरोना पॉझिटिव्ह मुलांना देऊ नका हे औषध; केंद्राने सांगितली उपचाराची योग्य पद्धत मीना कुमारी एवढं बोलून थांबल्या नाहीत, तर त्या पुढं म्हणाल्या की, मुलींना मोबाईल देऊच नका आणि जर तुम्ही मोबाईल दिलाच तर त्यांच्यावर लक्ष ठेवा की, त्या मोबाइलमध्ये काय करतात. यात त्यांच्या आईंची मोठी जबाबदारी आहे आणि आज जर मुली बिघडल्या ना तर त्यांच्या आईच त्यास जबाबदार असतील, असे त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसात बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पत्रकार मीना कुमारी यांना याबाबत सतत विचारणा करत होते. त्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात नुकत्याच एका 17 वर्षीय मुलीनं लैंगिक अत्याचार केल्यावर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर नोएडा जिल्ह्यातील सर्फाबाद गावात शेजारी राहणाऱ्या 4 वर्षांच्या मुलीवर 12 वर्षाच्या किशोरवयीन मुलाने बलात्कार केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Uttar pradesh news, Women, Women empowerment, Women harasment

    पुढील बातम्या