मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना पॉझिटिव्ह मुलांना बिलकुल देऊ नका हे औषध; केंद्राने सांगितली उपचाराची योग्य पद्धत

कोरोना पॉझिटिव्ह मुलांना बिलकुल देऊ नका हे औषध; केंद्राने सांगितली उपचाराची योग्य पद्धत

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाग्रस्त लहान मुलांवर उपचारासंबंधी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली, 10 जून : देशभरात पसरलेली कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट (Coronavirus Infection Second Wave) आता ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहेच. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानंही प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पूर्वतयारी सुरू केली आहे. मुलांसाठी खास रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था, औषध पुरवठा अशा अनेक पातळ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारनं  मुलांवरील कोविड-19च्या उपचारासंबंधी मार्गदर्शक सूचना (Guidelines to manage covid in children) जाहीर केल्या आहेत.

या सूचनांनुसार, मुलांवर उपचार करताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) वापर करू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोग्य सेवा संचालनालयानं हा सल्ला दिला आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना धोका असल्याचा दर्शवणारा कोणताही डेटा नाही, असं या आजाराबाबत नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय कृती दलातील तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलं आहे.

हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर भारतात आणखी एक जीवघेणा व्हायरस! इथं सापडला पहिला रुग्ण

याबाबत दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘दुसऱ्या लाटेत संसर्गग्रस्त झालेल्या आणि रूग्णालयात दाखल झालेल्या 60-70 टक्के मुलांमध्ये दुसरी सहव्याधी होती किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. निरोगी मुलांना अगदी सौम्य प्रमाणात हा आजार दिसून आला. ती लवकर बरीही झाली.’

‘तिसऱ्या लाटेत या आजाराचा संसर्ग मुलांनाच होईल, हा काही पक्का निष्कर्ष नाही. आतापर्यंत मुलांमध्ये मोठ्यांप्रमाणेच सिरोप्रिव्हलेन्स दिसून आला आहे. म्हणजेच मुलांमध्ये मोठ्यांइतकाच या आजाराचा प्रभाव दिसून आला आहे, असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना :

सौम्य संसर्ग

- लक्षणं न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सचा (Steroids) वापर हानिकारक असतो त्यामुळं उपचारासाठी किंवा प्रतिबंधात्मक औषधं म्हणून अँटीमायक्रोबियलची (Antimicrobials) शिफारस करण्यात आलेली नाही.

- एचआरसीटी चाचणीचा वापर सरसकट न करता तर्कसंगत पद्धतीनं वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.

- सौम्य संसर्गामध्ये ताप आणि घशातील सूज यावर दर 4 ते 6 तासांनी वजनानुसार योग्य प्रमाणात पॅरासिटामॉल घ्यावी. मोठ्या आणि किशोरवयीन मुलांमध्ये मिठाच्या पाण्यानं गुळण्या करण्याची शिफारस केली आहे.

मध्यम संसर्ग

- मध्यम संसर्ग झाल्यास, तत्काळ ऑक्सिजन थेरपी (Oxygen Therapy) सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- या पातळीवर सर्व मुलांमध्ये कोर्टीकोस्टिरॉइड्स आवश्यक नाहीत; ज्यांच्यामध्ये आजरा वाढत असेल त्यांना ते देण्याबाबत निर्णय घेता येईल. अँटीकोआगुलंट्सदेखील देता येऊ शकतात.

हे वाचा - लहान मुलांना कधी मिळणार कोरोना लस? मोदी सरकारने जाहीर केला 'तो' दिवस

तीव्र संसर्ग

- मुलांमध्ये तीव्र संसर्ग असल्यास आणि त्यांना श्वसनाचा जास्त त्रास होत असेल तर ताबडतोब आवश्यक ते उपचार सुरू करावेत.

- बॅक्टेरियाचा संसर्ग आढळल्यास अँटीमायक्रोबियल्स द्याव्यात. अवयव काम करेनासे झाले तर अवयवदानाचीही गरज भासू शकते. याकडे लक्ष द्यावे.

- 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी पालकांच्या देखरेखीखाली सहा मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी. ऑक्सिमीटर लावून मुलाला मुलाला सतत सहा मिनिटे चालण्यास सांगा. यामुळे त्याच्या ह्रदयाची गती, श्वसनाचा वेग आदी बाबी कळू शकतील.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19