मुंबई, 28 जून : मुंबईत या पावसाळ्यातील लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा पहिला बळी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भरत काळे अस या पंधरा वर्षीय मुलाचं नाव असून तो कुर्ला पूर्व येथील मिलन नगर भागात राहत होता. तर यात आणखी एक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईकरांनो सावधान, मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण, दोघांचा मृत्यू
त्यामुळे या भयानक आजाराजी कारणं आणि लक्षण जाणून घेऊयात… लेप्टोस्पायरोसिसची कारणं - पावसाळ्यात साठलेल्या सांडपाण्यामुळं लेप्टो होतो - संसर्गजन्य प्राण्यांचे मूत्र असलेलं पाणी जखमेच्या संपर्कात आल्यास लेप्टोची शक्यता - उंदीर, कुत्रा या प्राण्यांच्या मूत्रापासून संसर्ग होण्याचा संभव अधिक - संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साठलेल्या पाण्यातून चालणं टाळा - साठलेल्या पाण्यातून जावेच लागले तर, गमबूट घालून जावे - उघड्या जखमांशी पाण्याचा संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी..
शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठीची मतमोजणी सुरू
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं - अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, थंडी वाजणे या सगळ्यामुळे मैदानात पालिकेने आता योग्य खबरदारी घेणार गरजेचं आहे. त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. कोणताही त्रास झाला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण पावसाळ्यात अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आरोग्याशी खेळ करू नका. हेही वाचा… खासदारकीचा राजीनामा देईन पण नाणारची वीट रचू देणार नाही - नारायण राणे खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज

)







