खासदारकीचा राजीनामा देईन पण नाणारची वीट रचू देणार नाही - नारायण राणे

गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ पण नाणारची एकही वीट रचू देणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2018 08:25 AM IST

खासदारकीचा राजीनामा देईन पण नाणारची वीट रचू देणार नाही - नारायण राणे

मुंबई, 28 जून : गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ पण नाणारची एकही वीट रचू देणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नाणारची एकही वीट रचू देणार नाही. राज्यसभेचा खासदार जरी असलो तरी कोकणचा सुपुत्र आहे. शिवसेनेसारखं बोलून नाही दाखवणार, गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा फेकेन, खासदार जरी भाजपचा असलो तरी विरोध कायम राहणार. असं ठाम वक्तव्य करून नारायण राणेंनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे की, मी जनतेच्या बाजुनं आहे, अशी ठाम भूमिका नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. दरम्यान, मी शिवसेनेसारखं बोलून नाही दाखवत असं म्हणत त्यांनी शिवसेनेस टोमणाही मारला आहे.

प्लास्टिक बंदीवरून यू टर्न, आता छोट्या दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगी

तर दुसरीकडे नाणार प्रकल्पाबाबत भाजप आणि सेनेमधला तणाव वाढला असताना, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीची पुष्टी करण्यात आली नसली, तरी सेनेची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला. नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी उद्या उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली होती. करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भेटीचा प्रस्ताव फेटाळला.

Loading...

त्यात आता नारायण राणे यांनीही अशीही ठाम भूमिका घेतल्यानंतर आता नाणारचं काय होणार असा प्रश्न उपस्थित राहतो.

हेही वाचा...

VIDEO : सेल्फी काढण्याच्या नादात दोघे धबधब्यात पडले,पण...

मराठा आरक्षणाचं काय केलं?,कोर्टाचा सरकारला सवाल

लेप्टोस्पायरोसिसची कारण ?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 07:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...