S M L

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज

अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. पण खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 28, 2018 08:42 AM IST

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज

जम्मू-काश्मीर, 28 जून : अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. पण खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात पुढच्या 48 तासांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

पहलगाम बेस कॅम्पपासून सुरू झालेली ही यात्रा नन वॅन कॅम्पजवळ थांबवण्यात आली आहे. जेव्हा मुसळधार पडणारा पाऊस थांबेल आणि हवामान सुधारेल तेव्हाच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

सध्या कोणालाच पवित्र गुफेजवळ जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गुरूवारी यात्रेचा पहिला दिवस होता. कडक सुरक्षा बंदोबस्तात यात्रेकरू अमरनाथच्या दिशेनं चालत होते. पण वातावरणामुळे यात्रा थांबवण्याची वेळ आली आहे.दरम्यान, काल सोनमर्गमधल्या बलटालमध्ये काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी यात्रेकरूंनी विशेष पूजा केली. बीएसपी सुब्रमण्यम (मुख्य सचिव), बीबी व्यास (गव्हर्नरचे सल्लागार) आणि विजय कुमार (गव्हर्नरचे सल्लागार) यांनी जम्मूतील भगवती नगरमधील बेस कॅम्पमधून झेंडा दाखवून यात्रेला सुरूवात केली. अमरनाथ यात्रेसाठी दोन लाख भाविकांनी नोंदणी केली गेली आहे.

श्रद्धेने आलेल्या या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मूमध्ये कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. काश्मीरची रेल्वे स्थानक, मंदिरं, बस स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 08:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close