Shocking : मुली फोनवर बोलता-बोलता पळून जातात, महिला आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : मुली फोनवर बोलता-बोलता पळून जातात, महिला आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त वक्तव्य

UP woman commission Member आपण मुलींच्या फोनवर सतत लक्ष ठेवत राहायला पाहिजे. कारण मुली मुलांबरोबर फोनवर बोलत असतात आणि नंतर पळून जातात असं त्या म्हणाल्या.

  • Share this:

लखनऊ, 11 जून : उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या (Member of UP Women Commission) मीना कुमारी (Meena Kumari)एका वक्तव्यामुळं वादात अडकल्या आहेत. त्यांना राज्यातील बलात्कार आणि महिलाविरोधी अत्याचार कमी करण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत असा प्रश्न विचारला होता. पण त्यावर उत्तर देताना मीना कुमारी यांनी मुलींच्या वर्तनावरच प्रश्न उपस्थित केला. मुलींना मोबाईलच द्यायला नको. कारण त्या मुलांशी बोलतात आणि नंतर पळून जातात, असं त्या म्हणाल्या.

(वाचा-सावधान! हा Video पाहण्याआधी काळीज घट्ट करा, चिमुरड्यांसह संपूर्ण कुटुंबच चिरडलं)

महिला आयोगाच्या सदस्यांनी असं वक्तव्य हे चुकून केलं असेल असं वाटत असेल तर तसं असण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांनी यानंतरही बरंच काही म्हटंलं. मुलींच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलींना मोबाईल फोन देऊच नये. जर त्यांना फोन देत असाल तर रोज त्यांच्यावर निगराणी ठेवा. तरुणींवर आरोप करतानाच मीना कुमारी यांनी सर्व मुलींच्या आईदेखील दोषी असल्याचं वक्तव्य केलं. महिलांच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांच्या खऱ्या दोषी त्यांच्या आई असल्याचं या महोदया म्हणाल्या.

(वाचा-दीदींचा भाजपला आणखी एक मोठा झटका; बड्या नेत्याची 4 वर्षांनंतर घरवापसी)

आपली मुलगी कुठं जाते, काय करते कोणत्या मुलांबरोबर राहते, यावर आई वडिलांनी लक्ष ठेवावं असंही त्या म्हणाल्या. या सर्वामुळं आपण मुलींच्या फोनवर सतत लक्ष ठेवत राहायला पाहिजे. कारण मुली मुलांबरोबर फोनवर बोलत असतात आणि नंतर पळून जातात असं त्या म्हणाल्या.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी यावरून मीना कुमारी यांच्यावर टीका केली आहे. मुलींच्या हातात असलेला मोबाईल हे बलात्काराचं कारण नाही तर अशा प्रकारच्या मानसिकतेमुळं गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत असल्याचं म्हणत मालिवाल यांनी हल्लाबोल केला.

यावरून वाद सुरू झाल्यानंतर मीना कुमारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मुले अभ्यासासाठी मोबाईल वापरतात का हे तपासायला हवं असं म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. मुली पळून जाण्याच्या वक्तव्यावरूनही त्यांनी यूटर्न घेतला. मात्र सोशल मीडियावर तर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं त्यांच्यावर टीका सुरुच आहे.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 5:32 PM IST

ताज्या बातम्या