दिल्ली, 11 जून : दिल्लीच्या नजफगड (Delhi Nazafgad) परिसरात पहाटे झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातामध्ये (Accident) एकाच कुटुंबातील तिघांसह आणखी एक अशा चौघांचा मृत्यू झाला (Three from a family died) आहे. तर एका मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची परिस्थितीही गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे पहाटे हा अपघात झाला. डंपर चालकाला डुलकी आल्यानं हा अपघात झाला असं कारण सध्यातरी पुढं येत आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून अत्यंत मन हेलावणारं दृश्य त्यात दिसत आहे. कुटुंब चिरडल्याचं संपूर्ण दृश्य यात कैद झालं आहे. (वाचा- भारतीय बनावटीच्या COVAXIN लशीला मोठा धक्का; अमेरिकेनं आपत्कालीन वापरास दिला नकार ) शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. पहाटे नजफगड परिसरात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं असे चौघं मॉर्निंग वॉला निघाले होते. त्यावेळी फिरण्यासाठी निघालेले इतरही काही लोक रस्त्यावर होते. त्यावेळी अचानक मागून आलेल्या एका डंपर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं रस्त्यावरच्या आणि फुटपाथवरून जाणाऱ्या अनेक गाड्यांना धडक दिली. यामध्ये रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या काही जणांनाही वाहनांची धडक बसली.
दिल्लीच्या नजफगड परिसरात पहाटे झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांसह आणखी एक अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. सीसीटीव्हीत कुटुंबाला डंपरनं चिरडल्याचं दिसत आहे pic.twitter.com/66n5FV92SZ
— News18Lokmat (@News18lokmat) June 11, 2021
(वाचा- राज्याला मान्सूनने व्यापलं; 5दिवस मुंबईसह या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा ) या विचित्र अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पती अशोक, पत्नी किरण, मुलगा इशांत यांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील देव नावाच्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. त्याचबरोबर जसवंत सिंग नावाच्या एका व्यक्तीचा देखील मृत्यू या अपघातात झाला आहे. या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला त्या परिसरातील लोकांनी फरार होण्याआधीच पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. स्थानिक दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र पहाटे झालेल्या या अपघाताचं कारण डंपर चालक राजेशला झोप आल्यानं त्याला डुलकी लागली असावी, आणि त्यात त्याचं डंपरवरचं नियंत्रण सुटलं हे असू शकतं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.