मराठी बातम्या /बातम्या /देश /

हाथरस दंगल : आखाती देशातून आला पैसा, हवाला रॅकेटचा वापर, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

हाथरस दंगल : आखाती देशातून आला पैसा, हवाला रॅकेटचा वापर, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयानं (ED)  उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras) दंगल घडवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केलं आहे.

केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयानं (ED) उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras) दंगल घडवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केलं आहे.

केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयानं (ED) उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras) दंगल घडवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 12 फेब्रुवारी : केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयानं (ED)  उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras) दंगल घडवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याची विद्यार्थी शाखा कँपस फ्रंट ऑफ इंडियाच्या (CFI) 5 सदस्यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

कुणावर आरोपपत्र दाखल?

ज्या 5 सदस्यांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये आतिकुर रहमान (CFI राष्ट्रीय कोषाध्यक्ष), मसूद अहमद (CFI दिल्ली सरचिटणीस), राऊफ शरीफ (PFI सरचिटणीस), सिद्दीकी कप्पन आणि मोहम्मद आलम (PFI, CFI सदस्य) यांचा समावेश आहे. या सर्वांना हाथरसमधील पीडित परिवाराला भेटण्यासाठी जात असताना मथुरा पोलिसांनी अटक केलं होतं. पीडित परिवाराला भेटण्याच्या निमित्तानं हाथरसमध्ये दंगल घडवणे आणि सामाजिक सौहार्द खराब करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सर्वांच्या अटकेनंतर ED नं देखील त्याचा तपास सुरु केला होता.

सूत्रधार सापडला!

मथुराच्या जेलमध्ये या पाचही जणांची कसून तपासणी केली. त्यावेळी हाथरसमध्ये दंगल घडवण्याची त्यांची योजना माहिती झाल्याचा दावा ED च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. CFI चा राष्ट्रीय सरचिटणीस राऊफ शरीफ यानं दंगलीची सर्व योजना तयार केली होती. त्याच्या सल्ल्यानंतरच हे सर्व जण हाथरसमध्ये जात होते. राऊफला 12 डिसेंबर रोजी तो देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आली होती.

(वाचा - 'मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,' राहुल गांधींचा मोठा आरोप)

आखाती देशातून आला पैसा!

ED च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशातील PFI च्या प्रमुख नेत्यांनी हवाला रॅकेटसह वेगवेगळ्या पद्धतीनं राऊफकडे मोठी रक्कम पाठवली होती. एकूण 1 कोटी 36 लाख रुपये PFI आणि CFI च्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या रकमेचा वापर CAA आंदोलन, दिल्ली दंगल आणि हाथरस दंग्याच्या कटासाठी करण्यात आला.

(वाचा - लष्करप्रमुखांनी बजावलं : आक्रमक रहावं लागेल, नव्या धोक्यांचाही दिला इशारा!)

PFI च्या खात्यात 100 कोटी कॅश जमा

PFI च्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात 100 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी धक्कादायक माहिती या तपासात पुढं आली आहे. ED चे अधिकारी आता ही रक्कम कशी आणि कुणी जमा केली याचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Caa, Delhi, Hathras case, Uttar pradesh