जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Punjab Election Result 2022: भगवंत मान कुठे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, चन्नी आज देणार राजीनामा

Punjab Election Result 2022: भगवंत मान कुठे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, चन्नी आज देणार राजीनामा

Punjab Election Result 2022: भगवंत मान कुठे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, चन्नी आज देणार राजीनामा

Punjab Election Result 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल (Punjab Assembly elections) अन्य पक्षांसाठी धक्का देणारे ठरले आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूनं लागला.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 11 मार्च: पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल (Punjab Assembly elections) अन्य पक्षांसाठी धक्का देणारे ठरले आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूनं लागला. त्यानंतर भगवंत मान (Bhagwant Mann) हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं निकालांनी स्पष्ट केलं आहे. शहीद-ए-आझम भगतसिंग यांची भूमी असलेल्या खटकड कला येथे ते शपथ घेणार आहेत. नवज्योतसिंग सिद्धूच्या पंजाब मॉडेलपेक्षा पंजाबच्या लोकांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर अधिक विश्वास ठेवला. आम आदमी पक्षानं राज्यातील 117 पैकी 92 जागा जिंकल्या. 1997 मध्ये शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पार्टी युतीनं जिंकलेल्या 93 जागांपैकी पक्षाला एक जागा कमी पडली असली तरी हा एकाच पक्षाचा सर्वात मोठा विजय म्हटला जाईल. यापूर्वी 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं 77 जागा जिंकून असाच विजय मिळवला होता. सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 18 जागांवर समाधान मानावं लागलं. शिरोमणी अकाली दल आघाडीनं चार, भाजपनं दोन आणि एक अपक्ष उमेदवार जिंकला आहे. 2017 च्या निवडणुकीत AAP ने 20 जागा, अकाली दलानं 15, भाजपनं 3 जागा जिंकल्या होत्या. लोक इन्साफ पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या. अमन अरोरा यांनी सर्वात मोठा विजय मिळवला; 75 हजार 277 मतांनी विजयी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या त्सुनामीचा अंदाज 92 उमेदवारांच्या फरकाने लावता येतो. बहुतेक उमेदवार 20 हजारांहून अधिक फरकाने विजयी झाले मात्र अमन अरोरा यांच्या सुनाममधून सर्वाधिक फरकाने विजयी झाला. त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे जसविंदरसिंग धीमान यांच्याकडून 75277 हजारांच्या फरकाने विजय मिळवला. निकालानं सर्व दिग्गजांना धूळ चाटायला लावली आहे. प्रकाश सिंग बादल, सुखबीर सिंग बादल, बिक्रम सिंग मजिठिया, कॅप्टन अमरिंदर सिंग, बीबी राजिंदर कौर भट्टल, सलग सहा वेळा विजयी झालेले परमिंदर सिंग धिंडसा, सभापती राणा केपी सिंग, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल या सर्वांच्या जागा मोठ्या फरकानं गमवाव्या लागल्या आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागा गमावल्या आहेत. चन्नी मंत्रिमंडळातील केवळ सहा मंत्री सुखजिंदर रंधवा, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, अरुणा चौधरी, परगट सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, अमरिंदर सिंग राजा वाडिंग आणि राणा गुरजीत सिंग यांना त्यांच्या जागा वाचवता आल्या. मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांना जागा वाचवता आल्या नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 13 पैकी 4 जागा जिंकून पंजाबमध्ये आपला प्रवास सुरू करणारा आप 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला. आज 2022 मध्ये पंजाबमध्ये जवळपास 92 जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला आणि आज आप पक्ष यशस्वी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात