उत्तर प्रदेश,10 मार्च: UP Election Result 2022: ट्रेंडनुसार भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh assembly elections) पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. उत्तर प्रदेशात भाजप सध्याच्या निकालानुसार आघाडीवर आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणाऱ्या असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष AIMIM ची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अजून AIMIM नं एकही खातं उघडलेले नाही. ओवैसी ज्या प्रकारे यूपीतील प्रचारादरम्यान पक्षाच्या जागांवर दावा करत होते, ते सर्व दावे खोटे ठरल्याचं दिसून येत आहे. AIMIM नं खाते उघडलं नाही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आलेल्या ट्रेंडमध्ये एआयएमआयएमला आपलं एकही खातं उघडता आलेलं नाही. निवडणूक प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने पक्षाच्या जागेवर दावा केला जात होता, ते सर्व दावे फोल ठरले आहेत. यूपीमध्ये खाते न उघडल्याने असद्दीन ओवैसी निराश होण्याची शक्यता आहे. कारण ओवैसी यांना उत्तर प्रदेशातील मुस्लिम जनतेकडून खूप आशा होत्या. उत्तर प्रदेशच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर असल्यानं पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक आनंद साजरा करत आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्रेंडनुसार, भारतीय जनता पक्ष 276 जागांवर तर समाजवादी पक्ष 120 जागांवर आघाडीवर आहे. योगी आदित्यनाथांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे. (Chief Minister of Uttar Pradesh) कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नाही. याआधी यूपीमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत. मात्र त्यापैकी एकानंही पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे. 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत परत वापसी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्ता देणार असून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील असे पहिले मुख्यमंत्री बनतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली कोणताही पक्ष 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत वापसी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.