Home /News /national /

UP Assembly Election: निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका, योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा

UP Assembly Election: निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका, योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा

Big jolt to bjp in uttar pradesh before assembly election 2022: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजपला एक मोठा झटका बसला आहे. योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    लखनऊ, 11 जानेवारी : उत्तरप्रदेश निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) रणधुणाळी सुरू झाली असतानाच भाजपला एक मोठा झटका (big jolt to BJP) बसला आहे. उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनत पक्षाला रामराम करत स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Mourya) यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी 2017 मध्ये भाजपत प्रवेश केला होता आणि पडरौना विधानसभा क्षेत्रातून ते विजयी झाले होते. पडौरना मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अखिलेश यादव यांची भेट घेऊन स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वत: अखिलेश यादव यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं, "सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात आलेले इतर नेते, कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा." akhilesh Yadav with akhilesh Yadav with Swami Prasad Maurya सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वाी प्रसाद मोर्य यांच्यासोबत मंत्री धर्म सिंह सैनी आणि इतर चार आमदार सुद्धा समाजवादी पार्टीत प्रवेश करु शकतात. भारतीय जनता पक्षाचे मंत्री दारा सिंह चौहान हे सुद्धा पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. वाचा : गिरीश महाजन अडचणीत?, पुणे पोलिसांनी जळगावातून टेम्पोभर कागदपत्रे घेतली ताब्यात 5 राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम पहिल्या टप्पा - 10 फेब्रुवारीला मतदान दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी चौथा टप्पा -23 फेब्रुवारी पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी सहावा टप्पा - 3 मार्च सातवा टप्पा -7 मार्च पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी पाच राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहे, त्या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा 14 मे रोजी समाप्त होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहे. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेसाठी 70 जागा आहे. उत्ताराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. गोवा विधानसभेसाठी एकूण 40 जागा आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तर मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी समाप्त होणार आहे. मणिपूरमध्ये एकूण 60 जागा आहे. एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Election, Uttar pradesh

    पुढील बातम्या