Home /News /national /

UP Election: ठरलं ! अयोध्या, मथुरा, देवबंद नाही तर 'या' मतदारसंघातून योगी आदित्यनाथ लढवणार निवडणूक

UP Election: ठरलं ! अयोध्या, मथुरा, देवबंद नाही तर 'या' मतदारसंघातून योगी आदित्यनाथ लढवणार निवडणूक

Yogi Adityanath

Yogi Adityanath

उत्तर प्रदेशची विधानसभा (Uttar Pradesh Assembly Election 2022) निवडणूकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्यातील 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या नावाचाही समावेश आहे.

    नवी दिल्ली, 15 जानेवारी: उत्तर प्रदेशची विधानसभा (Uttar Pradesh Assembly Election 2022) निवडणूकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात उतरले असून ते गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पहिल्या टप्प्यातील 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. आदित्यनाथ त्यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच योगी आदित्यनाथ यांच्या जागेबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अयोध्या, देवबंदसह अनेक ठिकाणांहून ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा गोरखपूरमधूनच योगी आदित्यनाथ यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला आहे. भाजपने पहिल्या टप्प्यातील 58 पैकी 57 तर दुसऱ्या टप्प्यात 55 पैकी 48 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामधील 20 जागांवरील उमेदवार बदलण्यात आले आहेत. तर 63 जणांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये 10 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 107 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 14 नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यात तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. हे सर्व नेते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात निवडणुका होणार असून 10 फेब्रुवारीला राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: UP Election, Uttar pradesh, Yogi Adinath

    पुढील बातम्या