उत्तर प्रदेश, 22 जानेवारी: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh News) होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असल्याच्या राजकीय गदारोळात प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एक प्रकारचा यू-टर्न घेतला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi News) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा एकमेव चेहरा नसल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या की, पक्षाचा चेहरा असल्याबाबत प्रसारमाध्यमांकडून वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना मी शुक्रवारी पत्रकार परिषदेत थोडं चिडूनच बोलली होती.
तुमचा पक्ष तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा का घोषित करत नाही, असा सवाल ANI या वृत्तसंस्थेनं विचारला. यावर उत्तर देताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) म्हणाल्या की यात कोणताही संकोच नाही. कुठेतरी माझा पक्ष ठरवतो तर कुठे नाही. माझ्या पक्षाची ही पद्धत आहे. यामध्ये कोणताही संकोच नाही. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, हे पक्ष ठरवेल आणि काही राज्यांमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी चेहरा आहे असे म्हणत नाही. मी थोडं चिडून म्हणाली होती(हसत), कारण तुम्ही पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत आहात.
महिलांच्या कपड्यात लपवून ठेवले होते 4 किलो ड्रग्ज, NCB नं केला पर्दाफाश
माध्यमांची खिल्ली उडवत त्या म्हणाल्या की, अशी अनेक राज्ये आहेत आणि तेथे अनेक प्रभारी आहेत, मग ते काँग्रेसचे असो वा भाजपचे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहात की नाही, असे विचारता? तुम्ही त्यांना का विचारत नाही, हा प्रश्न फक्त मलाच का विचारला जातो.
कालच्या पत्रकार परिषदेत दिलं होतं स्पष्ट उत्तर
काल उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress)आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासोबतच अनेक आश्वासने देण्यात आली. काँग्रेसने यूथ मॅनिफेस्टो जारी करताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना यूपीमधील काँग्रेसच्या सीएम उमेदवाराबद्दल (Congress CM candidate) विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की, तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसत आहे का?
प्रियंका गांधी यांनी दिले होते संकेत
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही. मात्र त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगितला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी त्यांना विचारले की, यूपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तर देताना प्रियंका यांनी उलट प्रश्न केला की, तुम्हाला यूपीमध्ये दुसरा कोणता चेहरा दिसतो. तुम्हीच सांगा तुम्हाला यूपीमध्ये कोणता चेहरा दिसत आहे.
काँग्रेसकडून यूपीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी दिल्लीत उत्तर प्रदेशसाठी युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने 20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. 8 लाख नोकऱ्या फक्त महिलांना दिल्या जातील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Priyanka gandhi, Priyanka gandhi vadra, Uttar pradesh news, काँग्रेस