मुंबई NCBची गोव्यात छापेमारी दोन दिवसांपूर्वीच मुंबई एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (Mumbai NCB raid in Goa) केली आहे. मुंबई आणि गोवा एनसीबीने (Goa NCB) काल संयुक्तपणे उत्तर गोव्यातील अर्पोरा (Arpora) याठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांना अटक केली (2 female drug peddler arrested) असून यांच्याकडून जवळपास 25 किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त केल्या (Seized 25 kg Cannabis and MDMA tablets) आहेत. अटक केलेल्या महिलांमध्ये एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोघींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघींनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी संयुक्तपणे करत आहेत. IND vs SA : टेस्टनंतर वन-डेमध्येही राहुलची कॅप्टनसी फेल, सीरिज गमावल्याचं सांगितलं कारण तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबीच्या टीमने संयुक्तपणे जुन्या गोवा आणि उत्तर गोव्यातील बनस्तारीम आणि पोंडा याठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनसीबीने दोन महिला तस्करांना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी महिलांकडून पोलिसांनी 25 किलो गांजासह MDMA च्या काही टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमधील एक महिला विदेशी आहे.A team of NCB Mumbai seized 3.950 grams of Ephedrine which was concealed in ladies' wears at Andheri (E), Mumbai today. The consignment originated from Pune & was destined for Australia.NCB Mumbai registered the case. Further investigation is in progress: Narcotics Control Bureau pic.twitter.com/qhxsVUcaNR
— ANI (@ANI) January 21, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai News, NCB