Home /News /national /

UP Assembly Election 2022: 18 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' उमेदवार, दाखल केला उमेदवारी अर्ज; तीन पट्टीनं संपत्तीत वाढ

UP Assembly Election 2022: 18 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' उमेदवार, दाखल केला उमेदवारी अर्ज; तीन पट्टीनं संपत्तीत वाढ

UP Assembly Election 2022: मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे 18 कोटी इतके दिले आहे. तर वार्षिक उत्पन्न 27 लाख रुपये आहे. आता 2017 पासूनची त्यांची एकूण संपत्ती आता जवळपास तिप्पट झाली आहे.

    उत्तर प्रदेश, 29 जानेवारी: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.याच भागात शुक्रवारी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून सपा-पीएसपी युतीचे उमेदवार प्रसपा अध्यक्ष शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) यांनी सायकल चिन्हावर उमेदवारी दाखल केली. यावेळी दाखल केलेल्या मालमत्तेच्या तपशिलांमध्ये, प्रसाचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री यांनी त्यांच्या मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे 18 कोटी इतके दिले आहे. तर वार्षिक उत्पन्न 27 लाख रुपये आहे. आता 2017 पासूनची त्यांची एकूण संपत्ती आता जवळपास तिप्पट झाली आहे. हातोड्यानं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी दिलं सोडून, हे आहे त्यामागचं कारण दाखल केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, प्रगतीशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री शिवपाल सिंह यादव यांचे कुटुंब सुमारे 18 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहे. यामध्ये निवासी भूखंड आणि शेतजमिनीचा समावेश आहे. तर त्यांचे वार्षिक उत्पन्न 27 लाख रुपये आहे. शिवपाल यांचे डेहराडून आणि लखनऊ येथे निवासी भूखंड आहेत. त्यांच्याकडे एक रायफल आणि डबल बॅरल आहे. यासोबतच सैफई, मुचेहरा, चौबिया आणि नायकपुरा येथेही त्यांची शेतजमीन आहे. एकही फौजदारी खटला नाही 2017 मध्ये त्यांनी जसवंतनगर लढण्यासाठी मालमत्तेचा तपशील दिला तेव्हा एकूण मालमत्ता 6 कोटी दाखवली होती तर वार्षिक उत्पन्न 16 लाख रुपये होते. शिवपाल यादव यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 1977 मध्ये लखनऊ विद्यापीठातून बीपीएड पूर्ण केलं. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय आहेत. फौजदारी खटल्यांचा संदर्भ देत शिवपाल म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध कोणताही खटला प्रलंबित नाही. त्यासाठी प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Assembly Election, India, Samajvadi party, UP, UP Election, Uttar pradesh news

    पुढील बातम्या