Home /News /national /

हातोड्यानं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी दिलं सोडून, हे आहे त्यामागचं कारण

हातोड्यानं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी दिलं सोडून, हे आहे त्यामागचं कारण

एका महिलेनं आपल्या पतीची (Husband) हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुरुवातीला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अचानक पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे.

    तामिळनाडू, 29 जानेवारी: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एका महिलेनं आपल्या पतीची (Husband) हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुरुवातीला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अचानक पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे. 41 वर्षीय महिलेला भारतीय दंड संहितेच्या कलम 100 अंतर्गत सोडण्यात आलं आहे. या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला हा अधिकार आहे की तो धोक्याच्या प्रसंगी स्वतःचा बचाव करू शकेल. ही महिला तिच्या पतीसोबत राहत होती आणि घटनेच्या वेळी तिची 20 वर्षांची मुलगीही तिथे होती. महिलेच्या पतीबद्दल सांगितलं जात आहे की, त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो पत्नीवर अत्याचार करायचा आणि तिच्याकडून दारू विकत घेण्यासाठी पैसेही मागायचा. भंडाऱ्यावरुन परतताना 10 जणांसह उलटली बोटी, अंगावर शहारे आणणारा घटनेचा Live Video गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर महिलेचा पती दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेत त्याने आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यानंतर महिलेनं पतीला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याने पत्नीवर हल्ला केला. रिपोर्टनुसार, महिलेनं स्वत:ला आणि मुलीला वाचवण्यासाठी पतीवर हातोड्यानं वार करुन मारलं. यानंतर महिलेने शेजाऱ्यांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. यात महिलेच्या पतीचा जागीच मृत्यू झाला होता. महिला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले आणि हा खून स्वसंरक्षणार्थ झाल्याचा समज झाला. या प्रकरणी सुरुवातीला कलम (302) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्याचे आयपीसी कलम 100 मध्ये रूपांतर करण्यात आले आणि त्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली. या महिलेला पुन्हा अटक होणार नसल्याचं पोलिसांच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Murder news, Tamil nadu

    पुढील बातम्या