Bharat Bandh पूर्वीच व्यापाऱ्यांमध्ये फूट, वाचा आज काय काय राहणार बंद

Bharat Bandh पूर्वीच व्यापाऱ्यांमध्ये फूट, वाचा आज काय काय राहणार बंद

व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना असणाऱ्या द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने जीएसटीमधील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यासाठी 26 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजेच आज भारत बंद (Bharat Bandh 2021) चे आवाहन केले आहे. परंतू फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्सने (FAIM) यामध्ये सामील होण्यास नकार दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: जीएसटीच्या तरतुदीविरोधात उद्योजकांनी आज भारत बंद (Bharat Bandh 2021) पुकारला आहे. संयुक्त किसान मोर्चानेही पाठिंबा दर्शविला असून 1500 ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

फेडरेशन ऑफ ट्रेड कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वस्तू व सेवा कर (GST) च्या तरतुदींचा आढावा घेण्याची मागणी करण्यासाठी भारत बंद पुकारला आहे.

व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना असणाऱ्या द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने जीएसटीमधील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यासाठी  26 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजेच आज भारत बंद (Bharat Bandh 2021) चे आवाहन केले आहे. या बंदला अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर वेलफेअर असोसिएशनने (एआयटीडब्ल्यूए) भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज ठिकाठिकाणी व्यापारी बाजारपेठा बंद राहतील. असा दावा केला जात आहे की या बंदमध्ये 8 कोटी छोटे व्यापारी, 1 कोटी ट्रान्सपोटर्स, लघू उद्योग आणि महिला उद्योजक देखील सहभागी होणार आहेत.

CAIT चा दावा आहे, की यादिवशी 8 कोटीहून अधिक व्यापारी संपावर असतील. कॅटच्या नेतृत्वात येत्या 26 फेब्रुवारीला GST मधील कथित निरर्थक आणि अतार्किक तरतुदींना (unfair provisions in GST) परत घेण्यासह अमेझॉन या इ-कॉमर्स (E-commerce company Amazon) कंपनीवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

(हे वाचा-ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पाठ करा डेबिट कार्ड नंबर, वाचा काय आहे RBI चा नवा नियम)

या दरम्यामनच एक बातमी समोर येत आहे की व्यापाऱ्यांच्या या संघटानांमध्ये बंदपूर्वीच फूट पडल्याचं पाहायला मिळते आहे. कारण फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्सने (FAIM) यामध्ये सामील होण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. FAIM ने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

फेमचे असे म्हणणे आहे की,  दुकान बंद करणे किंवा भारत बंद यासारख्या विचारसरणीपासून FAIM दूर आहे. मात्र जीएसटी सुधारण्याची गरज असून त्यासाठी वाटाघाटीचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे फेमचे मत आहे. ते म्हणतात की कोरोना साथीच्या काळात अर्थव्यवस्था गंभीर टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत जबाबदार नागरिक म्हणून व्यापा्यांनी आंदोलनांपासून दूर राहिले पाहिजे. FAIM कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, 22 फेब्रुवारी 2021 रोजी 200 जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीएसटी सुधारण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

(हे वाचा-पेट्रोल दरवाढीचं Zomato च्या डिलिव्हरी बॉइजना नाही टेन्शन; हे आहे कारण)

कॅटने अशी माहिती दिली आहे की, जीएसटीतील कठोर तरतुदी संपवण्याची मागणी करण्यासाठी आज देशभरात 1500 ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे. देशातील अनेक बाजारपेठा बंद राहतील.  सर्व राज्यस्तरीय परिवहन संघटनांनी भारत सरकारने सुरू केलेल्या नवीन ई-वे बिल कायद्यांविरूद्ध कॅटला पाठिंबा दर्शविला आहे. या काळात परिवहन कार्यालये पूर्णपणे बंद राहतील अशी घोषणा करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण, लोडिंग / अनलोडिंग बंद राहील. सर्व परिवहन कंपन्यांना निषेधासाठी सकाळी 6 ते रात्री 8 या दरम्यान वाहने उभी करण्यास सांगितले गेले आहे.

देशातील ट्रान्सपोर्ट सेक्टर व्यतिरिक्त मोठ्या संख्येंने व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडेरेशन ऑफ अॅल्‍युमिनियम यूटेंसिल्‍स मॅन्यूफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पायसिस ट्रेडर्स असोसिएशन, ऑल इंडिया वूमेन एंटेरप्रेन्‍योर्स असोसिएशन, ऑल इंडिया कंप्‍यूटर डीलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन देखील सामील होणार आहेत. भारत बंदला संयुक्त किसान मोर्चाने देखील पाठिंबा दिला आहे. किसान बिल विरोधात आंदोलनं करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी ट्रान्सपोटर्स आणि ट्रेड यूनियनच्या या बंदमध्ये सहभागी व्हावं. शिवाय चार्डट अकाउंटंट्स असोसिएशन आणि टॅक्स अॅडव्होकेट यांचे ऑफिस देखील आज बंद राहणार आहे

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 26, 2021, 8:17 AM IST

ताज्या बातम्या