मराठी बातम्या /बातम्या /मनी /ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पाठ करा डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, वाचा काय आहे RBI चा नवा नियम

ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पाठ करा डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, वाचा काय आहे RBI चा नवा नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) एक नवा नियम लागू केला आहे त्यानुसार तुम्हाला या पुढे तुमचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि व्यवहारासाठी आवश्यक माहिती तोंडपाठ असणं गरजेचं आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) एक नवा नियम लागू केला आहे त्यानुसार तुम्हाला या पुढे तुमचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि व्यवहारासाठी आवश्यक माहिती तोंडपाठ असणं गरजेचं आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) एक नवा नियम लागू केला आहे त्यानुसार तुम्हाला या पुढे तुमचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि व्यवहारासाठी आवश्यक माहिती तोंडपाठ असणं गरजेचं आहे

  नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर करता का? जर तुम्ही या दोन्हीपैकी कोणतंही एक कार्ड वापरत असाल तर जरा या बातमीकडे लक्ष द्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) एक नवा नियम लागू केला आहे त्यानुसार तुम्हाला या पुढे तुमचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि व्यवहारासाठी आवश्यक माहिती तोंडपाठ असणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला आवश्यक त्याठिकाणी ही कार्ड्स बरोबर बाळगावी लागतील.

  काय आहे RBI चा नवा नियम ?

  तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डं वापरून कोणताही ऑनलाइन व्यवहार करता तेव्हा तुम्हाला आपोआप त्या साइटकडून विचारणा होते की आपल्या कार्डचे डिटेल्स सेव्ह करायचे का? जेणेकरून प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागत नाही. अनेकजण हा पर्याय स्वीकारतात आणि सीव्हीव्ही सोडून कार्डचे डिटेल्स सेव्ह करायला त्या वेबसाइटला परवानगी देतात. आता आरबीआयने काढलेल्या नव्या नियमानुसार ऑनलाइन व्यापारी, पेमेंट अग्रिगेटर आणि ई-कॉमर्स वेबसाईट्सना (online merchants, payment aggregators and e-commerce websites) ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. हा नियम जुलै 2021 पासून लागू होणार आहे. त्यामुळे दरवेळी व्यवहार करताना ग्राहकाला कार्डमध्ये बघून किंवा पाठ असेल तर तसं कार्डाची माहिती भरावी लागणार आहे.

  (हे वाचा-भारतीय खेळण्यांचा पहिला उत्सव 27 फेब्रुवारीपासून, डिजिटल प्रदर्शन आणि बरंच काही)

  या नियमाचा ग्राहकाला काय फायदा?

  आरबीआयने केलेला नियम कुणाला फायदेशीर ठरणार असेल तर तो ग्राहकाला. ग्राहकाच्या डेबिट काय किंवा क्रेडिट काय कुठल्याही कार्डाचे डिटेल्स या व्यापारी वेबासाईट्सना सेव्ह करता न आल्याने ग्राहकाचे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित होतील. सध्या ऑनलाईन आणि सायबर गुन्हे प्रचंड वाढत आहेत. वेबसाईटवर साठवलेली ही माहिती सुरक्षित आहे असं जरी या वेबसाइट्स सांगत असल्या तरीही तो डाटा हॅक करून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डाटा इतर कंपन्यांना विकला जाऊ शकतो आणि मग ही कार्ड वापरणाऱ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमोशनल मेसेज येतात त्यात ऑफर दिल्या जातात आणि पुन्हा पुन्हा खरेदी करायला भाग पाडलं जातं. यालाही थोड्या प्रमाणात चाप बसेल. त्यामुळे हा नियम ग्राहकासाठी हिताचा आहे.

  (हे वाचा-PNB चं कर्ज बुडवून फरार झालेल्या नीरव मोदीला बँक कर्मचाऱ्यामुळे झाली होती अटक)

  ई-कॉमर्स कंपन्यांची ओरड सुरू

  आरबीआयच्या नव्या नियमाचा फटका ज्यांना बसणार आहे त्या अमेझॉन, झोमॅटो, नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांनी याविरुद्ध ओरड सुरू केली आहे. हा नियम लागू झाला तर ग्राहकांना 16 अंकी कार्ड क्रमांक लक्षात पाठ करावा लागेल. तसंच जे ग्राहक एकाहून अधिक कार्ड वापरतात ते काय प्रत्येक कार्डाचा 16 अंकी क्रमांक लक्षात ठेवणार का असंही ते म्हणत आहेत. ते सगळ्यांनाच जमणार नाही असं सांगत त्यांनी कांगावा करायला सुरुवात केली आहे. त्यांना भीती आहे की या नव्या नियमामुळे त्यांच्या व्यवहारांवर मोठा परिणाम होईल. हा परिणाम नक्की होईल. पण कार्ड जवळ बाळगून ग्राहक हे व्यवहार करू शकणार आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या दाव्यात फारसा दम वाटत नाही.

  एकूण काय हा नियम लागू झाला तर तुम्हा-आम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत बाळगायला लागणार इतकंच.

  First published:

  Tags: Credit card, Money, Rbi, Reserve bank of india, Rules, Shopping debit card