मराठी बातम्या /बातम्या /मनी /

25 हजारात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 3 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

25 हजारात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 3 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

मोत्यांच्या शेतीसाठी एक तलाव (Pond), मोत्यांचं बीज आणि योग्य प्रशिक्षण (Training) यांची गरज असते. तलाव आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने खोदू शकतो किंवा त्यासाठी सरकार 50 टक्के सबसिडी (Subsidy) देतं, त्याचाही लाभ घेता येऊ शकतो.

नवी दिल्ली, 13 मे : फार मोठी गुंतवणूक न करता एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात का? मग मोत्यांची शेती हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यात सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत सबसिडीही मिळते. त्यामुळे मोत्यांची शेती करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढीला लागली आहे. अनेक जण मोत्यांच्या शेतीतून लखपती बनले आहेत.

मोत्यांच्या शेतीसाठी एक तलाव (Pond), मोत्यांचं बीज आणि योग्य प्रशिक्षण (Training) यांची गरज असते. तलाव आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने खोदू शकतो किंवा त्यासाठी सरकार 50 टक्के सबसिडी (Subsidy) देतं, त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. मोत्यांसाठी आवश्यक शिंपले (Oysters) अनेक राज्यांत मिळतात. दक्षिण भारतात (South India) आणि बिहारमधल्या दरभंगा (Darbhanga) इथल्या शिंपल्यांचा दर्जा चांगला असतो. मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. मध्य प्रदेशात होशंगाबाद (Hoshangabad) इथे आणि मुंबईतही (Mumbai) मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण (Pearl Farming) देणाऱ्या संस्था आहेत.

मोत्यांची शेती कशी करायची?

सगळ्यात आधी शिंपले एका जाळीत बांधून 10 ते 15 दिवसांसाठी तलावात टाकले जातात. ते स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. त्यानंतर त्यांना बाहेर काढून त्यांची छोटीशी सर्जरी केली जाते. म्हणजे शिंपल्यांचं तोंड उघडून त्यात वाळूचा एक कण टाकला जातो. त्यावर शिंपल्यातला जीव स्रावांची अनेक आवरणं तयार करतो. त्यातूनच पुढे मोती तयार होत जातो.

(वाचा - YouTube वर छोटे व्हिडीओ बनवून करता येणार मोठी कमाई, कंपनीची घोषणा)

एक मोती तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती तयार होतात. एका मोत्याला (Pearl) कमीत कमी 120 रुपये दर मिळतो. दर्जा चांगला असेल, तर 200 रुपयांहूनही अधिक किंमत एका मोत्याला मिळू शकते. एक एकर क्षेत्रावरच्या तलावात 25 हजार शिंपले टाकलेले असतील, तर त्यासाठी आठ लाख रुपये खर्च येईल. त्यातील 50 टक्क्यांहून अधिक शिंपले सुरक्षित पद्धतीने हाती लागतील. त्यातून वर्षाला साधारणतः 30 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळू शकतं.

(वाचा - पैसे कमावण्याचे 10 मार्ग, घरबसल्या मिळतील 50 हजार ते 1 लाख रुपये)

मोत्याचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन भारतीय आणि चिनी वाङ्‌मयात मोत्याचा उल्लेख आढळतो. भारतात आर्यांचा प्रवेश होण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व 1500 वर्षांपूर्वी व ग्रीक संस्कृतीत ख्रिस्तपूर्व 400 वर्षांपूर्वी मोत्याचा उल्लेख आढळतो. मॅसिडोनियाची सत्ता असताना इराणच्या आखातातून उत्तम मोती काढले जात असत. रोमच्या साम्राज्यातही मोत्यास पुष्कळ महत्त्व होतं. या साम्राज्यात काही उच्च पदस्थ अधिकारीच मोती वापरू शकत असत. राज घराण्यातील व्यक्तींचे अलंकार आणि राजचिन्हं यांसाठी मोत्यांचा सर्रास वापर होत असे, अशी माहिती विश्वकोशात दिली आहे.

First published:

Tags: Small business, Small investment business, Start business