नवी दिल्ली, 13 मे: कोरोना विषाणू महामारीमुळे (
Coronavirus Pandemic) देशातील शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. शालेय विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास केलं जातंय तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन उरकल्या जात आहेत. अनेक परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. Indian Army Common Entrance Exam 2021 ही परीक्षाही आता पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. देशभरातील अनेक तरुणांना भारतीय लष्करात नोकरी करण्याची इच्छा असते. देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची इच्छा असणारे तरुण-तरुणी आर्मीची परीक्षा देत असतात. त्यांनी ही नोकरी देशसेवेचं एक रूप वाटते. पण यावर्षी ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबमधील Indian Army Common Entrance Exam 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
तेलंगणातील हैदराबाद आणि राजस्थानातील जयपूर, जोधपूरमध्ये 30 मे 2021 ला ही प्रवेश परीक्षा होणार होती. पण ती सध्या पुढे ढकलत असल्याचं लष्कराने आपल्या अधिकृत वेबसाईट
joinindianarmy.nic.inच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. पुढची तारीख ठरेपर्यंत ही परीक्षा स्थगित केली असून नवी तारीख याच वेबसाईटच्या माध्यमातून कळवली जाणार आहे.
हे वाचा-या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात दिलासा, 6 महिन्यात 2 वेळा वाढला पगार
हैदराबादमधील हकीमपेठेत असलेल्या तेलंगणा स्टेट स्पोर्ट्स स्कूलमध्ये 4 मार्च ते 24 मार्च 2021 दरम्यान लष्कराने भरती रॅली म्हणजे शारीरिक चाचणी घेतली होती. यामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा होणार होती. पण ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
राजस्थानातही परीक्षा स्थगित
राजस्थानमधील तरुण-तरुणींना लष्करात भरती होण्यासाठी 30 मे 2021 ला प्रवेश परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा जोधपूर आणि जयपूर या केंद्रांवर होणार होती. अचानक राज्यात वाढत असलेल्या कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख ठरेपर्यंत ही परीक्षा स्थगित केली असून नवी तारीख लष्कराच्या वेबसाईटच्या माध्यमातून कळवली जाणार आहे.
हे वाचा- कौतुकास्पद!कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी बजाजचा हा निर्णय
पंजाबमध्येही परीक्षा स्थगित
पंजाबमध्ये लष्कराची ही प्रवेश परीक्षा 25 एप्रिल 2021 ला होणार होती. पण ती कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख ठरेपर्यंत ही परीक्षा स्थगित केली असून नवी तारीख लष्कराच्या वेबसाईटच्या माध्यमातून कळवली जाणार आहे.
लष्कराने दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांनी भरती रॅली आणि मेडिकल परीक्षा पास केली आहे त्यांनाच ही प्रवेश परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे हेच विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.पुढची तारीख ठरेपर्यंत ही परीक्षा स्थगित केली असून नवी तारीख लष्कराच्या वेबसाईटच्या माध्यमातून कळवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.