Home /News /national /

Union Cabinet Expansion : मोठी बातमी, मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंना डच्चू?

Union Cabinet Expansion : मोठी बातमी, मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंना डच्चू?

केंद्रीय मंत्रिमंडळातून 8 ते 10 मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता असून जवळपास 6 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश...

नवी दिल्ली, 07 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. जवळपास 20 ते 25 जणांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. तर काही मंत्र्यांची पंख छाटण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून चार नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल तर रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे, भागवत कराड, कपिल पाटील आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे. तर 8 -12 जणांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार आहे. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.  रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे त्या सर्वांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाच्या वतीने दूरध्वनी करण्यात आला आहे. यापैकी अनेक जण मंगळवारी रात्रीच दिल्लीत पोहोचले आहेत.

सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; पावसाळ्यात हेल्दी ठेवेल असा आहार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात  जवळपास 20  ते 25 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असून यासाठी सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. यावेळी 12 पेक्षा जास्त मंत्र्यांचा विभाग बदलण्याची शक्यता असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून 8 ते 10 मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता असून जवळपास 6 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी  होणार असल्याची सूत्रांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये 20 पेक्षा जास्त नवीन चेहरे असल्याचे संकेत राजकीय सूत्रांनी दिले असून केंद्रीय मंत्रिमंडळाचा तरुण चेहरा आणि निवडणूक होवू घातलेल्या राज्यांना जादा प्रतिनिधित्वचे सूत्र नरेंद्र मोदी यांनी आखले असल्याची माहिती पुढे आली आहे.

ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आरोग्याचं महत्त्व; 'या' पद्धतीने मोजा तुमचा Fitness

महत्त्वाचं म्हणजे, आगामी काही काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मनिपुर या राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या राज्यातील लोकप्रतिनिधींना ज्यादा संधी देण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान, सोशल इंजिनीरिंग कडे ठेवण्यात आले लक्ष देण्यात आले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशतील मंत्र्यांच्या कामकाजावर मोदी नाराज असून एक दर्जेन पेक्षा जास्त नेत्यांना पाठविण्यात आले निमंत्रण पाठविण्यात आले आहे.या विस्तार कार्यक्रमाला 100 ते 120 निमंत्रित होणार सहभागी होणार आहेत.राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये होणार शपथविधी होणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Raosaheb Danve, रावसाहेब दानवे

पुढील बातम्या