मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आरोग्याचं महत्त्व; 'या' पद्धतीने तपासा किती आहे तुमचा Fitness

ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आरोग्याचं महत्त्व; 'या' पद्धतीने तपासा किती आहे तुमचा Fitness

सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी  फिटनेसच सांगितलं आहे.

सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी फिटनेसच सांगितलं आहे.

वजन कमी करणं आणि फिटनेस या दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे. आपण सडपातळ असतो म्हणजे फिट आहोत असं होत नाही, असं सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर(Celebrity Nutritionist Rujuta Divekar) यांनी सांगितलं कसा तपासायचा फिटनेस.

नवी दिल्ली,07 जुलै: आजकाल वजन वाढणं (Weight Gain)  ही सगळ्यांसाठीच मोठी समस्या बदलेली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केलं जातात. एक्ससाईज,आहारात बदल ,चाललं औषधं घेणं याने वजन कमी होतं. मात्र यामुळे आपण फिट (Fitness)आहोत असा अर्थ होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण वजन काट्यावर  मोजू शकतो.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर  (Celebrity Nutritionist Rujuta Divekar) यांच्यामते वजन कमी  (Weight Loss) करण्याने आपण हेल्दी होत नाही तर,आपला फिटनेस चांगला असावा लागतो. ऋजुता दिवेकर यांच्या मते वेईंग मशिन आपलं वजन  मोजते मात्र, आपण किती फिट आहोत आणि आपले अवयव किती चांगल्या प्रकारे काम करतात हे सांगू शकत नाही. त्यामुळेच वेट लॉसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्या शरीरातली चरबी कमी होते. पण म्हणजेच आपलं हृदय चांगल्या (Healthy Heart) प्रकारे काम करायला लागल असं होत नाही. उलट कधीकधी वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला थकवा यायल लागतो. यासंदर्भात टिव्ही 9 ने माहिती दिली आहे. वजन कमी करताना आपला फिटनेस कसा मोजायचा हे जाणून घेउयात.

(झटपट नाश्त्यासाठी खाताय White Bread? 'किडनी फेल'चा ओढवून घ्याल धोका)

कंबर आणि हिप्स यांचा रेशो

टेपच्या सहाय्याने आपलाी कंबर आणि हिप्स याचा रोशो मोजा. यासाठी कमरेच्या वर तीन बोटं अंतर ठेवून माप घ्या त्यानंतर आपले हिप्स ही मोजा महिलांच्या कमरेचा आकार 35 पेक्षा कमी असायला हवा. महिन्याच्या कमरेचा आणि हिप्स मधला रेशो 0.70 पॉईंट ते 0.85च्या मध्ये असायला हवा आणि पुरुषांत करत आहात रेशो 0 85 ते 0.95 असायला हवा.

(पुरुषांप्रमाणे आली दाढी आणि आपल्याच रुपाच्या प्रेमात पडली महिला कारण...)

आराम करताना हार्ट रेट

सकाळच्या वेळी किंवा आराम करताना आपल्या हृदयाची गती किती आहे हे मोजा. यासाठी ऑक्सिमीटर किंवा प्लस रेटचा उपयोग करू शकता. आधी ऑक्सिमीटर आपल्या बोटावर लावा. त्यानंतर 1 ते  10 अंक मोजा आणि किती हार्ट रेट येतो हे लिहून ठेवा. पल्स रेट मोजण्यासाठी मान किंवा मनगटावरची नाडी मोजा. याची नोंद करून ठेवा .एक महिना वजन कमी करण्यासाठी डायट घेतल्यानंतर किती फरक दिसतो याकडे लक्ष ठेवा.

सिट ऍन्ड रिच टेस्ट

भिंती समोर खुर्ची ठेवा आणि त्याच्या बॉर्डरवर बसा. आपले पाय ताणून हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही टेस्ट करताना आपले खांदे, मटका  ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. या अवस्थेत आपण किती प्रमाणात आपले हात पायाला लावू  शकतो याचा अंदाज घ्या.

(नव्या संशोधनाने चिंता वाढवली; डेल्टाविरोधात 8 पट कमी प्रभावी ठरली कोरोना लस)

स्क्वॅट्स

खुर्चीवर ताठ बसा पाठण आणि मणका ताट ठेवून स्क्वॅट्स करा. एका मिनिटात आपण किती स्क्वॅट्स करू शकतो हे मोजा. सुरुवातीला एका मिनिटात पाच ते दहा   केल्यानंतर हळूहळू वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत हे प्रमाण वाढायला लागेल याने आपल्याला जास्त फायदा मिळेल.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss