• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • लैंगिक हिंसाचाराच्या रिपोर्टिंगबाबत भारतीय माध्यमांवर UNESCO ची टीका, धक्कादायक अहवाल

लैंगिक हिंसाचाराच्या रिपोर्टिंगबाबत भारतीय माध्यमांवर UNESCO ची टीका, धक्कादायक अहवाल

भारतीय माध्यमांमध्ये लैंगिक हिंसाचाराबद्दलचं वार्तांकन सध्या चांगल्या पद्धतीने होत नसल्याचं, त्यात सुधारणा आवश्यक असल्याचं मत 'युनेस्को'च्या अभ्यासात व्यक्त करण्यात आलं आहे.

  • Share this:
मुंबई, 31 जुलै: भारतीय माध्यमांमध्ये लैंगिक हिंसाचाराबद्दलचं वार्तांकन सध्या चांगल्या पद्धतीने होत नसल्याचं, त्यात सुधारणा आवश्यक असल्याचं मत 'युनेस्को'च्या अभ्यासात व्यक्त करण्यात आलं आहे. अशा विषयाच्या वार्तांकनावर संपादकीय संस्कारांची गरज असून, एकंदरीतच हे वार्तांकन चांगलं होण्यासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 'लैंगिक हिंसाचार आणि माध्यमं : समस्या, आव्हानं अँड भारतीय पत्रकारांसाठी मार्गदर्शक सूचना' (Sexual Violence and the News Media: Issues, Challenges and Guidelines for Journalists in India) या नावाने हा अभ्यास अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.या अभ्यासात मांडलेल्या विविध मुद्द्यांबद्दल माहिती घेऊ या. पराकोटीचा हिंसाचार, क्रूरता किंवा अनोळखी व्यक्तीकडून झालेला हल्ला (Unusual Cases) अशा प्रकारच्या तुलनेने कमी प्रमाणात घडणाऱ्या घटनांवर भारतीय माध्यमं (Indian Media) खूप जास्त भर देतात. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार होत असल्याचं चुकीचं चित्र तयार होतं. या अभ्यासात काही पत्रकारांना प्रश्न विचारून त्यांची वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दलची मतं विचारण्यात आली होती. लैंगिक हिंसाचार झालेल्या व्यक्तीचं किंवा करणाऱ्या व्यक्तीचं प्रोफाइल (Profile) काय आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं समाजातलं स्थान काय आहे, या मुद्द्याच्या अनुषंगाने पत्रकारांकडून या प्रकारच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते, असं उत्तर या अभ्यासात सहभागी झालेल्या 20.6 टक्के जणांनी दिलं. हे वाचा-shocking! देशातल्या 63 जिल्ह्यांत नाही एकही ब्लड बँक पोलीस किंवा प्रशासनाकडून अशा घटनांना दिला गेलेला प्रतिसाद हा पत्रकारांना वार्तांकनासाठी महत्त्वाचा मुद्दा वाटतो, असं 16.7 टक्के जणांना वाटतं, तर गुन्ह्याचं गांभीर्य हा मुद्दा वार्तांकनासाठी महत्त्वाचा वाटत असल्याचं 14 टक्के जणांना वाटतं. नागरी भागांतल्या (Rape & Sexual Violence in Urban Area) बलात्काराच्या घटनांपैकी 49 टक्के घटनांच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात. ग्रामीण (Rural) भागातल्या मात्र केवळ 22 टक्के बलात्काराच्या घटना वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात. बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटनांच्या बहुतांश बातम्यांमध्ये या दुर्दैवी घटनेसाठीच्या परिस्थितीबद्दलचं वार्तांकन (Reporting) नसतं. हल्ला कसा झाला, याबद्दलच्या सविस्तर स्पॉट न्यूज (Spot News) प्रसिद्ध होण्याचं प्रमाण जास्त असतं. या घटनांसाठी बातम्यांमधून पीडितेलाच जबाबदार धरलं जाण्याचं प्रमाण 2.2 टक्के असतं; पण बातम्यांमध्ये पीडितेची बाजू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मांडण्याचं प्रमाण दुर्मीळ असतं, असं निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आलं आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या 19.5 टक्के जणांनी त्यांच्या बातम्यांमध्ये थेट बलात्कार हा शब्द वापरला आहे. 51 टक्के जण बलात्कार असा थेट उल्लेख न करता तसं अप्रत्यक्षपणे सुचवणारे शब्द वापरतात. 78 टक्के पत्रकारांना असं वाटतं, की लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भाने समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण जबाबदार आहोत; मात्र केवळ 7 टक्के बातम्याच अशा प्रकारच्या घटनांवरच्या उपायांबद्दल भाष्य करताना दिसतात. हे वाचा-कॉल सेंटर कानपूरमध्ये अन् अमेरिकेत लोकांची फसवणूक, 80 लाखांना लुटले या अभ्यासात भारतातल्या सहा भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या 10 वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधल्या वार्तांकनाचं तुलनात्मक विश्लेषण करण्यात आलं. 14 भाषांमधल्या, तसंच मुद्रित, रेडिओ आणि ऑनलाइन माध्यमांमधल्या 257 पत्रकारांच्या मुलाखतीही यासाठी घेण्यात आल्या. लैंगिक हिंसाचारासंदर्भातल्या वार्तांकनाच्या सद्यस्थितीत सुधारणा होण्यासाठी काही उपाय या अभ्यासानंतर सुचवण्यात आले असून, बलात्कार किंवा लैंगिक हिंसाचाराच्या वार्तांकनासाठी कडक आणि निश्चित मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय पातळीवर, पत्रकार संघटना, तसंच पत्रकारिता क्षेत्रातल्या आघाडीवरच्या माध्यमांनी नॅशनल चार्टरची निर्मिती करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. संवेदनशील वार्तांकनाप्रति असलेली माध्यम संस्थांची कटिबद्धता आणि दायित्व यांना त्या चार्टरद्वारे प्रोत्साहन मिळेल. लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या वार्तांकनाच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रियांबद्दल पत्रकारांना प्रशिक्षण (Journalist Training) देणं, त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना देणं आवश्यक आहेच; शिवाय त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची (Mental Health) काळजी घेणंही गरजेचं आहे. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना ताणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा पत्रकारांसाठी पीअर-सपोर्ट नेटवर्क्स (Peer Support Networks) स्थापन करण्याची गरज या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. संस्थात्मक पातळीवर विचार करता, लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासंदर्भातल्या वार्तांकनामध्ये कशी भाषा वापरावी, याची शैली हे संस्थेने निश्चित करावं. प्रादेशिक संदर्भ आणि भाषा यांचा विचार त्यात केला गेलेला असावा, असं सुचवण्यात आलं आहे. हे वाचा-भारतीय सैन्याला मोठं यश, जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याला कंठस्नान लैंगिक अत्याचारासंदर्भातलं वार्तांकन आणि त्यावरचे संपादकीय संस्कार आदींबद्दलच्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) माध्यमांच्या दैनंदिन कामकाजातच समाविष्ट करण्याची गरज आहे. अशा संवेदनशील मुद्द्यांबद्दलचं (Sensitive Issues) चुकीचं किंवा खोटं वार्तांकन (Misreporting) होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी देशातल्या बहुतांश न्यूजरूम्सना तथ्य पडताळणी, एफआयआरची पडताळणी, अन्य अधिकृत स्रोतांकडून माहितीची तपासणी आदी बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणांवरून घटनेची पडताळणी करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांच्या वार्तांकनासाठी घटनास्थळी जाणाऱ्या वार्ताहरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. त्यांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक त्या गोष्टी आणि स्वसंरक्षणाचं प्रशिक्षणही देण्याची गरज आहे. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराची बातमी किती चालणारी आहे, याचा विचार न करता अशा प्रत्येक घटनेचं रिपोर्टिंग होण्याप्रति प्रत्येक माध्यम संस्थेने पुढाकार घेतला पाहिजे, दायित्व दर्शवलं पाहिजे. तसंच, लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या, निगेटिव्ह जेंडर स्टिरिओटाइप्सचं (Negative Gender Stereotypes) समर्थन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करता कामा नयेत. समाजातल्या बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट व्हावी, अशा उद्देशाने प्रत्येक संस्थेने धोरणं आणि कार्यक्रम आखावेत. त्यामुळे पत्रकारांना सामाजिक बदल घटवत असल्याची प्रेरणाही मिळेल.
First published: