Home /News /national /

काश्मीरमध्ये मसूद अजहरचा जवळचा दहशतवादी लंबू ठार, पुलवामा हल्ल्यात होता हात

काश्मीरमध्ये मसूद अजहरचा जवळचा दहशतवादी लंबू ठार, पुलवामा हल्ल्यात होता हात

Jaish e Mohammed Lamboo killed: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे. जैश ए मोहम्मदचा टॉपचा दहशतवादी अबू सैफुल्लाला ठार करण्यात आलं आहे.

    श्रीनगर, 31 जुलै: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे. जैश ए मोहम्मदचा टॉपचा दहशतवादी अबू सैफुल्लाला ठार करण्यात आलं आहे. काश्मीर झोन पोलिसांचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैशशी (Jaish-e-Mohammed -JeM)संबंधित पाकिस्तानी दहशतवादी लंबू (Lamboo)आजच्या चकमकीत मारला गेला. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवली जात आहे. या कारवाईसाठी आयजीपी काश्मीरने लष्कर आणि अवंतीपूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात अबू सैफुल्लाचा हात होता. अबू सैफुल्ला ऊर्फ अदनान ऊर्फ इस्माईल, ऊर्फ लंबू अशा विविध नावानं काश्मिर घाटीत ओळखला जात होता. पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालच्या हंगरमर्गमध्ये झालेल्या चकमकीत तो ठार झाला आहे. त्याच्यासोबत त्याचा आणखी एक साथीदारही मारला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लंबूचा संबंध जैशचा संस्थापक मसूद अजहरशी होता. अजहरच्याही तो खूप जवळचा होता असं सांगण्यात येत आहे. 2018 मध्ये लंबू आंतरराष्ट्रीय सीमेवरून काश्मीरमध्ये आला. त्याचा दुसरा कोड नाव सैफुल्ला होते. जैश त्याच्या सर्वात महत्वाच्या कमांडरना हा कोड देतात. अबू सैफुल्ला पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी होता. 14 फेब्रुवारी 2019 च्या पुलवामातल्या हल्ल्याचा प्लान करण्यामध्ये अबू सैफुल्ला मुख्य सुत्रधार होता. त्याने हल्ल्यात वापरलेला आयईडी बनवला होता,असंही म्हटलं जात आहे. लंबू हा रौफ अजहर तसंच अम्मार या दहशतवादी म्होरक्यांशीसोबतही त्याचे जवळचे संबंध होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist

    पुढील बातम्या