नवी दिल्ली, 30 जुलै : देशात कोरोनाच्या या दोन लाटा (Two waves of corona virus) येऊन गेल्या असताना आणि आता तिसरी लाट (Third Wave) येण्याची भीती वर्तवली जात असताना देशासाठी एक धक्कादायक माहिती पुढं आली आहे. देशातील 63 जिल्ह्यांमध्ये एकही रक्तपेढी (Blood Bank) नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandviya) यांनी लोकसभेत (Lok Sabha) दिली आहे.
देशातील रक्तपेढ्यांची स्थिती
देशात एकूण 3500 मान्यताप्राप्त रक्तपेढ्या आहेत, असं आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितल आहे. मात्र देशात 36 जिल्हे असे आहेत, जिथं एकही ब्लड बँक नाही. देशातील प्रत्येक जिल्ह्यात ब्लड बँक स्थापन करण्याच्या धोरणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.
समान वितरणाची गरज
देशात शहरी भागात अधिक ब्लड बँका आहेत. त्याखालोखाल निमशहरी भागात आणि सर्वात कमी ग्रामीण भागात असणं, हे योग्य नसून त्याबाबत सरकार नियोजन करत असल्याची माहिती मांडविया यांनी दिली आहे. 63 जिल्ह्यांमध्ये ब्लड बँका सुरु करण्यासाठी तातडीने पावलं उचण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
वास्तविक, जमा केलेल्या रक्तावर प्रक्रिया करणाऱ्या ब्लड बँका या कमी संख्येनं असतात. छोट्या ब्लड बँकांकडे केवळ रक्त साठवण्याची क्षमता असते. याचा विचार करून ग्रामीण आणि शहरी भागात लोकसंख्येच्या प्रमाणात ब्लड बँकांचं नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
हे वाचा -मुंबईत लसीकरणाची नवी मोहिम, आजपासून पालिकेकडून चाचणीला सुरुवात
सांगितलं हे कारण
अऩेकदा प्रशासकीय सोयीसाठी कागदोपत्री नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये ब्लड बँका नसल्याचं दिसतं. मात्र त्यातील बहुतांश जिल्हयांना मूळ रचनेनुसार शेजारील जिल्ह्यामधून रक्तपुरवठा होत असतो, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Blood bank, Parliament