News18 Lokmat

वीर सावरकरांचा अपमान, कर्मफळ येथेच आहे!, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 06:41 AM IST

वीर सावरकरांचा अपमान, कर्मफळ येथेच आहे!, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा

मुंबई, 9 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.

''सावरकर हे मृत्युंजय होते, ते महान स्वातंत्र्यसेनानी तर होतेच, पण विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते. अशा वीर सावरकरांचा जाहीर अपमान राहुल गांधी यांनी केला. स्वा. सावरकर आज त्यांची बाजू मांडायला हयात नाहीत, पण तरी राहुल गांधी, तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजीव गांधी यांची हत्या दुर्दैवीच आहे, पण सावरकरांचा त्याग सदैव प्रेरणादायी आहे. राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांविषयी जे अपमानास्पद उद्गार काढले, कृती केली त्याबद्दल त्यांना कधीही ‘क्लीन चिट’ मिळू शकणार नाही'',अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय ?

- मोदी हे वाटेल ते बोलतात, त्यांना दुसऱ्यांविषयी आदर नाही असेही काही जणांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने संयम पाळला पाहिजे हे मान्य, पण संयमाची टाळी एका हाताने वाजत नाही. मोदी हे काही महात्मा गांधी किंवा विनोबा भावे नाहीत. ते एक पक्के कसलेले राजकारणी आहेत. मुख्य म्हणजे ते हजरजबाबी आहेत.

वाचा :VIDEO 'पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही तर ठोकशाही'

Loading...

- राहुल गांधी त्यांना जाहीर सभांतून ‘चोर’ म्हणतात व मोदी यांनी त्याबद्दल गांधींवर फुले उधळावीत किंवा घरी चहापानास बोलवावे अशी कुणाची अपेक्षा आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी केलेले विधान चुकीचे आहे हे एकवेळ मान्य करू, पण क्रांतिकारकांचे शिरोमणी वीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी जे घाणेरडे उद्गार काढून संपूर्ण क्रांतिकारकांचा जो अपमान केला त्याबाबत कुणी वेदना व्यक्त केली आहे काय?

- एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी वीर सावरकर हे ब्रिटिशांची माफी मागून कसे सुटले याची नक्कल करून सादरीकरण केले होते. त्यांना आता पंतप्रधानांनी त्यांचे ‘कर्म’च दाखवले.

वाचा :VIDEO : राजीव गांधींनी INS विराटचा वापर टॅक्सीसारखा केला - पंतप्रधान मोदी

- राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधींनी कोणतेही मोठे देशकार्य केले नव्हते. त्यामुळे देशासाठी त्याग वगैरे शब्द त्यांच्यापासून खूप दूरचे आहेत. इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले व नंतर त्यांचे राजकारण व जीवनही दुर्दैवाने संपले, पण वीर सावरकरांचे तसे नव्हते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घरातील अष्टभुजा देवीपुढे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध मरेपर्यंत झुंजण्याची व प्रसंगी बलिदानाची शपथ घेतली.

- पुढे सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची तयारी केली व इंग्रज सरकार उलथवून टाकण्यासाठी क्रांतिकारकांची जमवाजमव सुरू केली होती. सावरकरांची दहशत घेतलेल्या इंग्रज सरकारने सावरकरांना दोनवेळा जन्मठेप म्हणजे पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली व त्यांना अंदमानला पाठवले.

- दहा वर्षे त्यांनी तिथे भयंकर यातना भोगल्या. त्याच्या तोळाभर जरी यातना ‘गांधी’ परिवाराने भोगल्या काय?

वाचा :SPECIAL REPORT : हिंगोलीत 'वंचित' फॅक्टरचा कुणाला फटका, निकालाचं गणित बिघडणार?

- अंदमानच्या काळकोठडीत दहा वर्षे यातना भोगल्यावर राजकारणात सहभागी होणार नाही या शर्तीवर इंग्रजांनी त्यांची मुक्तता केली. ही इंग्रजांसमोर शरणागती किंवा माफीनामा नव्हता तर ती एक तात्पुरती व्यवस्था होती.

- राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांविषयी जे अपमानास्पद उद्गार काढले, कृती केली त्याबद्दल त्यांना कधीही ‘क्लीन चिट’ मिळू शकणार नाही.

- राहुल गांधी यांनी मोदींना सांगितले, कर्म तुमची वाट पाहत आहे. मोदी यांनी सावरकरांबाबतचे राहुल गांधींचे कर्म लगेच समोर आणले.

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर'मुळे नाशिकमध्ये पुन्हा इंजिन येईल ट्रॅकवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2019 06:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...