जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO 'पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही तर ठोकशाही'

VIDEO 'पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही तर ठोकशाही'

VIDEO 'पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही तर ठोकशाही'

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली 08 मे : देशातल्या सर्व राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि मतदान शांततेत पार पडत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र गोलबोट लागलंय. तिथल्या प्रचारात आणि मतदानाच्या वेळीही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही तर ममता बॅनर्जी यांची ठोकशाही असल्याची टीका भाजपने केली आहे.

    जाहिरात

    पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे. तृणमूलचे अनेक नेते भाजपमध्ये आले. भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टिकरणाचा आरोप करत ध्रुविकरणाचं राजकारण करत असल्याची टीका केला होती त्यामुळे वातावरण चांगलच तापलं आहे.

    उत्तर प्रदेशात 2014 सारखं यश मिळण्याची शक्यता भाजपला वाटत नाही. त्यामुळे तिथे जे नुकसान होईल ते पश्चिम बंगालमध्ये भरून काढण्याची भाजपची योजना आहे. तर ममता बॅनर्जी यांची ही दुसरी टर्म असल्यामुळे तिथल्या स्थानिक कारभाराविषयी लोकांच्या मनात नाराजी आहे. त्या असंतोषाचा फायदा मिळेल असं भाजपला वाटतं.

    जाहिरात

    मतदनाच्या पाचव्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी उडाल्यात. पश्चिम बंगालच्या राजकारणात डाव्या पक्षांनी हिंसाचाराला सुरुवात केली आणि तृणमूल काँग्रेसने तीच परंपरा पुढे नेली असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय. News18Indiaला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.

    जाहिरात

    अमित शहा म्हणाले, बंगालच्या जनतेने डावे आणि तृणमूलचा हिंसाचार बघितला आहे. दांडगाईच्या बळावर व्यवस्था उभी करण्याचं काम गेली काही दशक या लोकांनी केलं. लोकांनी डाव्यांना बाजूला करून तृणमूलला सत्ता दिली. मात्र त्यांनीही हिंसेचीच परंपरा पुढे चालवली. लोकांनी डावे आणि तृणमूलचा दिर्घकाळ अनुभव घेतला आहे. आता त्यांनी भाजपला संधी द्यावी असं आवाहन आम्ही लोकांना केलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात