जाहिरात
मराठी बातम्या / देश / राज्यसभेत उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली वेगळी, सभापतींनी दिली समज, पाहा हा VIDEO

राज्यसभेत उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली वेगळी, सभापतींनी दिली समज, पाहा हा VIDEO

राज्यसभेत उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली वेगळी, सभापतींनी दिली समज, पाहा हा VIDEO

साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांनी शपथ घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जुलै : साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांनी शपथ घेतली. पण, उदयनराजेंची शपथ यात वेगळी ठरली. आज सकाळी अकरा वाजता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्यात सदस्यांना शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

जाहिरात

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली. योगायोग! महाराष्ट्रात भूकंप घडणारे अजितदादा आणि फडणवीसांचा आज हॅप्पी बड्डे उदयनराजे यांच्यानंतर शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांनी शपथ घेतली. प्रियांका यांनी अस्सल मराठी पूर्ण शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे नेते भागवत कराड आणि काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी सुद्धा मराठीतूनच शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून फौजीया खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, तब्येत ठीक नसल्यामुळे त्या आज शपथविधीला हजर नव्हत्या. उर्वरीत सदस्यांचा शपथविधी अधिवेशनात पार पडणार आहे. दरम्यान,  उदयनराजे भोसले यांनी न्यूज 18 लोकमतशी खास बातचीत केली.  ‘भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे’, असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या  राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर प्रतिक्रिया दिली. मराठा क्रांतीचं पुन्हा आंदोलन! उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध उद्या उतरणार रस्त्यावर ‘कोरोनाचा कठीण काळ आहे.पण घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रबिंदू म्हणूनच आजवर काम करत आलो. जेव्हा पद नव्हतं तेव्हा समाजकारण केलं, राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहीन’ अशी ग्वाही उदयनराजेंनी दिली. ‘कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल’ अशी भीतीही राजेंनी बोलून दाखवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात