मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षातील नेत्यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडवणीस आणि राष्ट्रवादीचे दबंग नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आला आहे. हे दोन्ही नेते काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत वेगळे ठरले आहे. पण काही दिवसांपूर्वी हे दोन्ही नेते सत्तेसाठी एकत्रित आले आणि त्याची चर्चा सर्वाधिक झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्या फळीतील विधिमंडळ दमदार आणि सक्षम प्रत्येक जबाबदारी सांभाळणारे दोन नेत्यांचा आज वाढदिवस आहे. हे दोन नेते म्हणजे अर्थात भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार. योगायोग असा की, या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आज एकाच दिवशी आला आहे. हे दोन्ही नेत्यामध्ये काही बाबतीत साम्य आहे तर काही बाबतीत एकमेकांच्या विरोधात वेगवेगवेळ्या दिशांचे आहे. पण, तरीही हे दोन्ही नेते काही क्षण एकत्रित आले होते आणि महाराष्ट्रात भूकंप घडला होता. शरद पवारांसह उदयनराजे भोसले घेणार खासदारकीची शपथ, ही आहे संपूर्ण यादी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्तासंघर्ष सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवारांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर पहाटे अचानक शपथविधी घेतला. अर्थात या शपथविधीचा राजकीय धमाका सर्वांनाच बसला. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसची अशी चर्चा सुरू असताना देवेंद्र फडवणीस आणि अजितदादा यांनी हातमिळवणी करत राज्यात नवं समीकरण केलं. हे राजकीय समीकरण अनेकांना मोठा धक्का देणारे तर होतेच पण कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वेगळं पर्व देखील ठरू शकलं असतं. मात्र, पुढे घडलं वेगळेच. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा हे अत्यंत आक्रमक, स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. कोणतीही भीडभाड न ठेवता कोणाला कितीही वाईट वाटलं तरी त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट असते. प्रशासनावर अत्यंत पकड अजित पवारांची जमेची बाब आहे. दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालेले फडवणीस यांनी पाच वर्षाच्या कारभारामध्ये उत्तम प्रशासन आणि संघटनांवर मजबूत पकड सिद्ध करून दाखवली. एकीकडे राम मंदिराचे भूमिपूजन, दुसरीकडे अडवाणी अजूनही आरोपीच,शिवसेनेची बोचरी टीका अजित पवार जितके स्पष्ट असतील तितकेच विरोधातले चित्र फडवणीस यांचे आहे. कमी बोलणं आणि कृतीतून सर्वकाही करून दाखवून देणे ही फडणवीस यांची कार्यपद्धती आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि अजितदादा एकत्रित आले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला होता. पवारांच्या घरात पहिल्यांदा घर फोडण्याचं काम फडणवीस यांनी केल्याची जोरदार चर्चा रंगली. पण कालांतराने हा राजकीय डाव तिथेच फसला.वेगवेगळ्या पक्षाचे असलेले हे दोन्ही नेते सत्तेसाठी काही क्षण एकत्रित आले होते, पण कालांतराने बाजूलाही व्हावं लागलं. मात्र, त्या दिवसापासून परत अजित पवार कोणती वेगळी भूमिका घेता आणि परत एकदा फडणवीसांसोबत एकत्रित येत आहेत का? याचीच राजकीय वर्तुळात चर्चा काय रंगली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.