मराठी बातम्या /बातम्या /देश /

'आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने लक्ष घाला', उदयनराजेंची शरद पवारांना विनंती

'आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने लक्ष घाला', उदयनराजेंची शरद पवारांना विनंती

विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच उदयनराजे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते.

  • Published by:  sachin Salve
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले(udayanraje bhosale) यांनी नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)  यांची भेट घेतली आहे. यावेळी 'मराठा आरक्षणाबाबत वकिलांकडून कोर्टात योग्य मांडणी झाली नाही. सरकारनं लवकर तोडगा काढावा अनथा उद्रेक होईल' अशा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. तसंच शरद पवारांनी वडिलकीच्या नात्यानं यात लक्ष घालावे' अशी विनंतीही केली. नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवास्थानी जाऊन उदयनराजे भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ‘या’ विद्यापीठात अ‍ॅडमिशन घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीनं मागितला घटस्फोट! मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने  श्वेत पत्रिका सादर करावी. मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर नाही. वकिलांनी सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नाही' असा आरोप उदयनराजे यांनी केला. वडिलकीच्या नात्यानं पवारांनी यात लक्ष घालावे अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. राज्य सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच उदयनराजे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. 17 वर्षांच्या मुस्लीम मुलीने केला 36 वर्षांच्या पुरुषाशी विवाह, पण नंतर... भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्याचे टाळले होते.  शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. ‘आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा,आपणास दीर्घायुष्य लाभो’,अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. संपूर्ण वर्षभरात दोन्ही नेत्यांमधील एवढाच तो संवाद होता. आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट झाली.
First published:

Tags: उदयनराजे भोसले, मराठा आरक्षण, शरद पवार

पुढील बातम्या