जाहिरात
मराठी बातम्या / देश / 17 वर्षांच्या मुस्लीम मुलीने केला 36 वर्षांच्या पुरुषाशी विवाह, पण नंतर...

17 वर्षांच्या मुस्लीम मुलीने केला 36 वर्षांच्या पुरुषाशी विवाह, पण नंतर...

17 वर्षांच्या मुस्लीम मुलीने केला 36 वर्षांच्या पुरुषाशी विवाह, पण नंतर...

एका 17 वर्षांच्या मुस्लीम मुलीनं (Muslim Girl) 36 वर्षांच्या पुरुषाशी लग्न केलं आहे. या विवाहाला त्यांच्या कुटुंबांचा विरोध असल्यानं या जोडप्यानं सुरक्षेसाठी न्यायालयाचे (Court) दरवाजे ठोठावले

  • -MIN READ
  • Last Updated :

    पंजाब, 11 फेब्रुवारी : भारतात आजही 21 व्या शतकात जातीबाह्य, धर्मबाह्य प्रेमविवाहांना (Love marriage) बऱ्याचदा विरोध होत असतो. जुन्या काळापेक्षा आताच्या आधुनिक काळात याबाबतीत बराच फरक पडला असला, आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाह सर्रास होत असले तरीही प्रेमविवाहांना विरोध होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत असतात. काही वेळा घरच्यांच्या विरोधामुळे अनेक प्रेमी पळून जाऊन लग्न करतात. घरचे लोक पोलिसात तक्रार नोंदवतात. दोन्ही कुटुंबात वादविवाद, हाणामारी होण्याच्या घटनाही घडतात. अनेकदा मुलगी कायदेशीर दृष्ट्या लग्नाच्या वयाची नसल्यानं पळवल्याची तक्रार मुलाविरुद्ध केली जाते. आंतरधर्मीय विवाह असेल तर काहीवेळा अधिक तणावाची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्यानं प्रेमी जोडप्याला सुरक्षेसाठी पोलिसांची किंवा थेट न्यायालयात धाव घ्यावी लागते. सध्या अशाच एका जोडप्याच्या विवाहाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टीव्ही 9 हिंदीनं दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील (Punjab) ही घटना असून, यात एका 17 वर्षांच्या मुस्लीम मुलीनं (Muslim Girl) 36 वर्षांच्या पुरुषाशी लग्न केलं आहे. या विवाहाला त्यांच्या कुटुंबांचा विरोध असल्यानं या जोडप्यानं सुरक्षेसाठी न्यायालयाचे (Court) दरवाजे ठोठावले, तेव्हा न्यायालयानं मुस्लीम पर्सनल लॉच्या आधारे (Muslim Personal Law) हा विवाह वैध ठरवत या जोडप्याला आधार दिला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर (Social Media ) जोरदार ट्रेंड होत आहे. या जोडप्यानं मुस्लीम रीतीरिवाजानुसार विवाह केला आहे. मुलीच्या कुटुंबाचे म्हणणे आहे, की ही मुलगी कायदेशीरदृष्ट्या सज्ञान नाही, त्यामुळे हा विवाह बेकायदेशीर आहे. मुस्लीम पर्सनल कायद्यानुसार 15 वर्षांची मुलगी विवाह करू शकते, त्यामुळे भारतीय कायद्यानुसार 18 वर्षांची अट असली तरी, मुस्लीम पर्सनल कायद्याआधारे हा विवाह कायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे या जोडप्याला दिलासा मिळाला आहे. या दोघांचा हा पहिलाच विवाह असून, 21 जानेवारी रोजी त्यांनी विवाह केल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाला दोघांच्या कुटुंबाकडून विरोध असल्याने या जोडप्यानं आधी पोलिसांकडे (Police) संरक्षणाची (Protection) मागणी केली होती. त्याकरता एसएसपींनां पत्र लिहिलं होतं, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे अखेर या जोडीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मात्र या जोडप्याला दिलासा दिला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात