अमरोहा, 16 एप्रिल : कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. सध्या जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. मात्र हीच कोरोना चाचणी एका रुग्णांसाठी धोक्याची ठरली. उत्तर प्रदेशमधील 66 वर्षीय व्यक्तीला सर्दी, खोकला असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली.
या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने अलिगढ येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले. सोमवारी रात्री उशीरा रिपोर्ट आले तेव्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या घरातील आणखी 8 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली, हे सुद्धा शोधण्यास सुरुवात झाली.
वाचा-BREAKING : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 हजाराचा टप्पा
त्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी अलिगढ प्रयोगशाळेतील रिपोर्ट मागवले. यावेळी आधीच्या अहवालात, चुकून हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांचे रिपोर्ट खरं तर निगेटिव्ह होते. मात्र मेडिकल रिपोर्टमधल्या एका चुकीमुळे त्यांच्यावर कोरोना संबंधित उपचारही करण्यात आले. दरम्यान या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या पाच लोकांनाही घरी पाठवण्यात आले आहे.
वाचा-चीनने भारताला दिला धोका? 50 हजार PPE कीट गुणवत्ता चाचणीत फेल
अमरोहाचे सीएमओ मेघसिंह म्हणाले, "नौगानवा सदादच्या या इसमाच्या कोरोना रिपोर्टमध्ये चुकीची माहिती छापली गेली होती. आधीच्या अहवालानुसार त्याला कोव्हिड -19 पॉझिटिव्ह दाखविण्यात आले होते पण जेव्हा आम्ही जेव्हा रिपोर्ट पाहिले तेव्हा ते निगेटिव्ह होते. रिपोर्ट लिहिण्यामध्ये ही चूक झाली होती". दरम्यान या प्रकरणानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दोन ते तीनवेळा रिपोर्टची पडताळणी करण्यास सांगितले आहे.
वाचा-आता 800 मिली रक्त करणार कोरोनावर उपचार, भारतात लवकरच होणार 'या' थेरपीचा वापर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona