मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 हजाराचा टप्पा, मुंबईतील संख्याही वाढली

BREAKING : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 हजाराचा टप्पा, मुंबईतील संख्याही वाढली

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जवळपास चार आठवड्याच्या लॉकडाऊनंतरही राज्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 16 एप्रिल : महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत असून आता राज्यातील कोरोनाग्रस्तांनी 3 हजाराचा टप्पा पार केला आहे. तसंच मुंबईतही कोरोनाचे नवे 107 रुग्ण समोर आले आहेत. जवळपास चार आठवड्याच्या लॉकडाऊनंतरही राज्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातील 3 हजार 81 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये नव्या 165 रुग्णांचा समावेश आहे. केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याआधीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली होती. मात्र आता जवळपास महिनाभरानंतरही कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ होत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये 15 पोलिसांचा समावेश

मुंबईत मागील 24 तासांमध्ये 5 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 15 वर गेली आहे.

भारतासह जगात काय आहे कोरोनाची स्थिती?

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. 180 हून अधिक देशांतील 2,083,237 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेतय. तर आतापर्यंत 1 लाख 34 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजारहून अधिक आहे. तर आतापर्यं 414 रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 344 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर जगभरात आतापर्यंत 510,329 रुग्ण बरे झाले आहेत.

First published:

Tags: Coronavirus