मराठी बातम्या /बातम्या /देश /

चीनने आता भारताला दिला धोका? 50 हजार PPE कीट गुणवत्ता चाचणीत फेल

चीनने आता भारताला दिला धोका? 50 हजार PPE कीट गुणवत्ता चाचणीत फेल

देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

भारतातील मोठ्या खासगी कंपन्यांकडून देणगी म्हणून मिळालेल्या बर्‍याच किट या गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोनाव्हायरसची प्रकरणे देशभरात सतत वाढत आहेत. गुरुवारपर्यंत देशात 12 हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या सगळ्यात भारताने चीनकडून 1 लाख 70 हजार पीपीई किट मागवल्या आहेत. भारतातील मोठ्या खासगी कंपन्यांकडून देणगी म्हणून मिळालेल्या या किट गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, चीनमधून 1 लाख 70 हजार किट आल्या होत्या. यातील 50 हजार किट गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या आहेत. त्याचबरोबर 30 हजार आणि 10 हजार किटही गुणवत्ता चाचणीत फेल झाल्या आहेत. ग्वाल्हेरच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळेत या किटची चाचणी घेण्यात आली. याआधी चीनने अनेक देशांना बनावट आणि कमी दर्जाचे मास्कही पाठवले होते.

वाचा-आता 800 मिली रक्त करणार कोरोनावर उपचार, भारतात लवकरच होणार 'या' थेरपीचा वापर

अहवालानुसार, एकीकडे सरकारी अधिकारी म्हणाले की, ते फक्त CE/FDA certified PPE किट खरेदी करीत आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केलेल्या नाही तर देणगी स्वरुपात मिळालेल्या काही किट या गुणवत्ता चाचणीत अयशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे त्या वापरल्याही जाऊ शकत नाहीत. त्याच वेळी, या प्रकरणात संबद्ध व्यक्तीने म्हटले आहे की CE/FDA certified कीटना भारतात गुणवत्ता चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. ज्या किट चाचण्या फेल झाल्या आहेत, त्या भारतातील मोठ्या खासगी कंपन्यांकडून देणगी म्हणून मिळाल्या होत्या.

वाचा-भारतात लवकरच तयार होणार कोरोनाची लस? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

भारतात कीट तयार करण्यावर भर

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सुत्रांनी असे सांगितले की, "आमच्याकडे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जास्त कीट असतील. त्यानंतर आणखी ऑर्डर देण्यात येईल. सरकारचा असा अंदाज आहे की जर भारतात 2 दशलक्ष पीपीई कीट असतील तर भारताची स्थिती चांगली असेल. घाबरून जाण्याची गरज नाही",  असे सरकारी अधिकारी म्हणाले. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑर्डर्सची संख्या वाढत आहे. चीन हा प्रमुख पुरवठा करणारा देश आहे. आम्ही पूर्वी आयातीवर पूर्णपणे अवलंबून होतो मात्र आता भारतात कीट तयार करण्यावर जास्त भर देण्यात येत आहे, असे सांगितले. सध्या घरगुती पीपीई उत्पादनांवर जास्त जोर दिला जात आहे.

वाचा-देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार पार, आतापर्यंत 414 रुग्णांचा मृत्यू

First published: