मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता 800 मिली रक्त करणार कोरोनावर उपचार, भारतात लवकरच होणार 'या' थेरपीचा वापर

आता 800 मिली रक्त करणार कोरोनावर उपचार, भारतात लवकरच होणार 'या' थेरपीचा वापर

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे मात्र या भयंकर व्हायरसवर अद्याप उपाय शोधता आलेला नाही. अशा परिस्थितीत आता भारतानं कोरोना विषाणूच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू करण्याची तयारी केली आहे. यासाठी सध्या भारतीय शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत. याआधी भारतात प्लाझ्मा थेरपीने कोरोना रूग्णांवर उपचार केले गेले आहे, याचा फायदाही झाला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे आतापर्यंत 800 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये रक्ताचा वापर करून अॅन्टीबॉडीजमध्ये असलेले प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर कोरोना विषाणूच्या रुग्णांना प्लाझ्माची इंजेक्शनं दिली जातात. जेव्हा शरीर कोणत्याही जीवाणू किंवा जंतूच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अॅन्टीबॉडीज सोडली जातात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अॅन्टीबॉडीज असतात ज्याने कोरोना विषाणूशी लढा देऊ शकतात.

वाचा-भारतात लवकरच तयार होणार कोरोनाची लस? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते. चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनदेखील त्याची चाचणी घेत आहेत. या तंत्रज्ञानाच्या चाचणीवरही भारत पुढे जात आहे. प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोनावर उपचार करण्याचा विचार करणार्‍या रुग्णालये आणि संस्थांनी प्रथम संस्थाविषयक नीतिशास्त्र समिती (IEC) प्रोटोकॉल अंतर्गत क्लिनिकल चाचण्या घेणे आवश्यक आहे. चाचणी सुरू करण्यापूर्वी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (DCGI) परवानगी घ्यावी लागते. याशिवाय, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियामध्ये रुग्णालये नोंदवणे देखील आवश्यक आहे.

वाचा-देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार पार, आतापर्यंत 414 रुग्णांचा मृत्यू

प्लाझ्मा थेरपी वापरणारे केरळ पहिले राज्य

केरळ हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने प्लाझ्मा थेरपीवर संशोधन आणि प्रोटोकॉल सुरू केले आहेत. श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी (SCTIMST) यांना आयसीएमआरने 11 एप्रिल रोजी प्लाजमा थेरपीच्या चाचणीसाठी मान्यता दिली आहे. दरम्यान, डीसीजीआय (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) कडून ग्रीन सिग्नल अद्याप मिळालेला नाही. रक्तदात्यासंदर्भात डीसीजीआयने बरेच नियम तयार केले आहेत, जसे की रक्तदात्याकडे गेल्या तीन महिन्यांत परदेशी प्रवासाची नोंद असू नये. चाचणीसाठी नियम शिथिल करण्याचे आवाहन एससीटीआयएमएसटीने केले आहे. दिल्लीत प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेण्याची तयारीही सुरू आहे.

वाचा-महाभयंकर Coronavirus चा नाश कधी होणार? शास्त्रज्ञांनी दिलं असं उत्तर

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published:

Tags: Corona