जोधपूर, 10 जून : राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यामध्ये एका शालेय चिमुकलीवर अत्याचार (Rape on school girl) झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शाळेच्या परिसरात शिक्षकांनीच चिमुकलीवर अत्याचार केल्याचं (Teacher raped student) समोर आलं आहे. अत्यंत गंभीर अशा या गुन्ह्यात पोलिसांनी दोन शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोघ घ्यायला सुरुवात केली आहे. या दोघांच्या विरोधाल पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. चिमुकलीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे.
(वाचा-BJP नेत्याच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, आधी बलात्कार..डोळे काढले, त्यानंतर...)
अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार
मोकमगड परिसरातील शेरगडमधल्या एका प्राथमिक शाळेमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित चिमुकलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मार्चच्या महिन्याच्या अखेरीस मुलगी शाळेच्या परिसरात असताना तिच्यावर सहिराम आणि सुजाराम बिश्नोई नावाच्या शिक्षकांनी तिला आमिष दाखवत एका खोलीत नेलं आणि त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार दिल्याचं, तक्रारीत म्हटलं आहे. मुलीनं तिच्या नातेवाईकांना याबाबत उशिरा सांगितल्यामुळं तक्रार द्यायला उशीर झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.
(वाचा-चिमुरडीवर पणजोबांनी केले लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
याघटनेबाबत असं सांगितलं जात आहे की, चिमुकलीची तब्येत अचानक खराब झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनी तिला दवाखान्यात नेलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला. कारण दवाखान्यात तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. हे ऐकताच सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. त्यानंतर मुलीला विचारणा केली असता, तिनं कुटुंबीयांना सर्वकाही सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला.
ही चिमुकली सरकारी शाळेमध्ये सहावीच्या वर्गामध्ये शिकते. शाळेतल्या या दोन नराधम शिक्षकांनी तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेत नापास करण्याची धमकी हे शिक्षक मुलीला देत होते. त्यामुळं मुलीनं कुणालाही काही सांगण्याची हिम्मत केली नाही. मात्र तिची तब्येत खराब झाली आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळं अखेर सर्वकाही समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rajasthan, Rape