झारखंड, 10 जून : झारखंडमधून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथे नराधमांनी दुष्कृत्याच्या सर्व सीमा पार केल्या. पलामू जिल्ह्यात स्थानिक भाजप नेत्याच्य 16 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला, तिचे डोळे काढले गेले आणि शेवटी आत्महत्या असल्याचं दाखवण्यासाठी तिचा मृतदेह झाडावर लटकवला. या प्रकरणात पोलिसांनी प्रदीप कुमार सिंह नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
ही घटना 7 जूनची असल्याचं सांगितलं जात आहे. पीडित मुलगी सकाळी 10 वाजता घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही, त्यामुळे घरातील सदस्यांनी तिचा तपास सुरू केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करू लागले. पोलीस पीडितेला शोधायचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बुधवारी त्यांना लालीमाटी जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह दिसला. याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. यापैकी एका मुलीची हत्या करण्यात आली. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा-चिमुरडीवर पणजोबांनी केले लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांना घटनास्थळावरुन मोबाइल फोन सापडला आहे. त्या मोबाइल फोनच्या आधारावर प्रदीप याला अटक करण्यात आली आहे. पांकीचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमारने सांगितलं की, पीडिताच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याचा गुन्हा नोंदविला होता. पोलीस याबाबत तपास करीत होते, तोच जंगलातून एक मृतदेह सापडला. प्राथमिक तपासानुसार मुलीची हत्या केल्यानंतर प्रकरणाला आत्महत्येचं रुप देण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असून पोलीस रिपोर्टच्या त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Crime news, Jharkhand, Rape