मराठी बातम्या /बातम्या /देश /

CAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही 2 जणांचा मृत्यू, 10 जणांवर चाकूहल्ला

CAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही 2 जणांचा मृत्यू, 10 जणांवर चाकूहल्ला

येथे हिंसाचाराचा संशय आल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला 5 एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवली होती

येथे हिंसाचाराचा संशय आल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला 5 एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवली होती

येथे हिंसाचाराचा संशय आल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला 5 एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवली होती

  • Published by:  Meenal Gangurde
शिलाँग, 1 मार्च : नागरिकत्व संशोधन कायद्यासंदर्भात (CAA) दिल्लीमधील हिंसाचार उफाळला होता. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता मेघालयातून बातमी आली आहे. येथे नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध व समर्थन करणाऱ्यांमध्ये उद्भवलेल्या दंगलीत एका जमावाने शनिवारी शिलॉंग येथील गर्दी असलेल्या बाजारात चाकूने हल्ला केला. या जमानाने शिलाँग येथील अनिवासितांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. याशिवाय शिलाँगमधील लॅग्सिंग, चेरापूंजी शहरातील ल्यू सोहरा बाजारातही हल्ला झाला असून यामध्ये 2 अनिवासित जखमी झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी खासी छात्र संघ (KSU) आणि आदिवासी नसलेल्यांमध्ये मारामारी झाली. यामध्ये बांगलादेशाच्या सीमाजवळील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील इचमती परिसरातील एका स्थानिक टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आली होती. सरकारने 1 मार्चच्या सकाळपर्यंत शिलाँग बाजार आणि त्यांच्या जवळील क्षेत्रात कर्फ्यूची घोषणा केली होती. यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे दोन गट तैनात करण्यात आले होते. आणखी काही गटांचे पाचारण करण्यात आले होते. हे वाचा - दिल्ली हिंसाचार : आप नगरसेवकाच्या घरात सापडले पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच शिलाँगमधील सर्वात जुन्या बाजारांपैकी असलेल्या बारा बाजारावर झालेल्या हल्ल्यातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील 29 वर्षीय रुपचंद दीवन यांनी रस्त्यात जीव सोडला. लॅग्सिंगमध्ये 21 वर्षीय आकाश अली याच्यावर हल्ला करण्यात आला. या हिंसाचारानंतर येथून 8 जणांना अटक करण्यात आले आहे. शिलाँग येथील हिंसाचाराचा संशय असल्याने अनेक भागांमधील मोबाइल सेवा रद्द करण्यात आली होती. शिवाय दिवसाला 5 एसएमएस पाठविण्याची मर्यादा ठेवण्यात आली होती. हे वाचा - दिल्लीत सकाळ होताच दगडफेक आणि जाळपोळ सुरू, हिंसाचारात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू सीएएवर चर्चा करण्यासाठी केएसयूच्या बैठकीत आणि इनर लाइन परमिट (आयएलपी) लागू करण्याच्या मागणीनंतर झालेल्या वादंगात इचमती येथे राहणाऱ्या लुरशाई हाइनेविता (35 वर्ष) यांचा मृत्यू झाला. मेघालयातील मोठ्या भागात सीएए लागू करण्यात येणार नसून व्यावहारिक स्वरुपात जर पाहिलं तर हे संपूर्ण राज्य सहाव्या अनुसूचीअंतर्गत येतं. इनर लाइन परमिट हे अनिवासी लोकांना येथे प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठीचं डॉक्युमेंट आहे. डिसेंबरमध्ये सीएए पारित केल्यानंतर मेघालय विधानसभेत आयएलपी लागू करण्यासाठी सर्वांच्या संमंतीनुसार एक प्रस्ताव पास करण्यात आला आहे.
First published:

Tags: Caa, Protest

पुढील बातम्या