मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी! Twitter ने रवि शंकर प्रसाद यांचं अकाउंट केलं ब्लॉक, तब्बल एका तासानं झालं सुरू

मोठी बातमी! Twitter ने रवि शंकर प्रसाद यांचं अकाउंट केलं ब्लॉक, तब्बल एका तासानं झालं सुरू

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आणि भारत सरकार यांच्यामध्ये सुरू असलेला वाद काही क्षमण्याचं नाव घेत नाही आहे. ट्विटरने केंद्रीय कायदा व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांचं ट्विटर अकाउंट सुमारे एक तास ब्लॉक केलं होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 25 जून: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आणि भारत सरकार (Indian Government) यांच्यामध्ये सुरू असलेला वाद काही क्षमण्याचं नाव घेत नाही आहे. ट्विटरने केंद्रीय कायदा व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांचं ट्विटर अकाउंट सुमारे एक तास ब्लॉक केलं होतं. याचं असं कारण देण्यात आलं की,  त्यांनी अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केलं आहे. मात्र, नंतर ट्विटरने केंद्रीय इशारा देत केंद्रीय मंत्र्यांचं खातं पुन्हा एकदा सुरू केलं आहे. रविशंकर प्रसाद यांनी स्वत: पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली की त्यांचं ट्विटर अकाउंट तब्बल एका तासासाठी ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यांनी असं म्हटलं आहे की ट्विटरने त्यांच्या अकाउंटचा अॅक्सेस जवळपास एका तासासाठी बंद ठेवला होता आणि याकरता अमेरिकेच्या Digital Millennium Copyright Act या कायद्याचं उल्लंघन केल्याचा हवाला देण्यात आला होता. हे वाचा-डोवल यांनी केली पाकची पंचाईत; SCO बैठकीत 'जैश' आणि 'लष्कर'ला संपवण्याचा प्लॅन केंद्रीय मंत्र्यांनी या घटनेबाबत माहिती देताना काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये ट्विटरने ते कारण सांगितलं आहे की, त्यांच्या अकाउंटचा अॅक्सेस का बंद करण्यात आला होता, तर दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये अॅक्सेस परत मिळाल्याची माहिती देण्यात आली होती. हे वाचा-अख्ख्या विमानात केवळ एक प्रवासी, जाणून घ्या बिझनेसमनचा सुपर अमेझिंग सोलो प्रवास काही दिवसांपूर्वी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President M Venkaia Naidu) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही महत्त्वाच्या नेत्याच्या पर्सनल ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक हटवली होती. वाद वाढल्यानंतर ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या पर्सनल अकाउंटची ब्लू टिक पुन्हा सक्रीय केली. यावेळी ट्विटरनं असं स्पष्टीकरण दिलं होतं की, जुलै 2020 पासून अकाउंट लॉग इन केल्यानं असं झालं होतं. अमेरिकन सोशल मीडिया कंपनी असणाऱ्या ट्विटरने केलेली ही कारवाई अशावेळी समोर आली आहे जेव्हा भारत सरकार आणि ट्विटरमध्ये आयटी नियमांवरुन वाद सुरू आहेत.
First published:

पुढील बातम्या