• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • एका तिकिटात बुक केलं अख्खं विमान? अमृतसर ते दुबई बिझनेसमननं केला एकटा प्रवास

एका तिकिटात बुक केलं अख्खं विमान? अमृतसर ते दुबई बिझनेसमननं केला एकटा प्रवास

संपूर्ण विमानात मी एकटाच प्रवासी असेन आणि अख्खा प्रवास मी एकट्यानेच करेन असंही एखाद्याला वाटू शकतं. असंच काहीसं झालं आहे एका प्रवाशांसोबत. जाणून घ्या काय झालं नेमकं.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 जून: एखादी गोष्ट एकट्याने करावी अशी इच्छा माणसाच्या मनात कायमच असते. लहानपणी वाटतं की, आईस्क्रीमचं फॅमिली पॅक आपण एकट्याने फस्त करावं. मैदानावर क्रिकेट खेळताना वाटतं आपल्यालाच बॅटिंग मिळावी. रेल्वेची अख्खी बोगी एकट्यासाठी बूक करावी किंवा अगदी संपूर्ण थिएटरमध्ये एकट्याने चित्रपट पहावा. यापैकी एखादी इच्छा तुमच्याही मनात डोकवून गेली असेल. पण किरकोळ गोष्टी सोडता रेल्वे आणि थिएटरसंबंधी (Railway or Theatre) इच्छा पैशांअभावी पूर्ण करणं शक्य नाही हे आपण जाणतोच. हे जसं तसं संपूर्ण विमानात मी एकटाच प्रवासी असेन आणि अख्खा प्रवास मी एकट्यानेच करेन असंही एखाद्याला वाटू शकतं. पण त्यासाठी सगळ्या विमानाची तिकिटं खरेदी करायला हवीत. तसं न होता जर कुणाला ही एकट्याने विमानातून संपूर्ण प्रवास करण्याची संधी मिळाली तर त्याला आपण ‘महाराजा’ आहोत असं वाटलं तर काय गैर आहे. अगदी तसंच झालंय बिझनेसमन आणि दानशूर एस पी सिंग ओबेरॉय यांच्या आयुष्यात. ओबेरॉय यांनी बुधवारी 23 जूनला पंजाबमधल्या अमृतसरवरून दुबईला (Amritsar-Dubai Flight) जाणाऱ्या विमानाचं तिकीट काढलं होतं. त्यांना विमानात गेल्यावर लक्षात आलं की संपूर्ण विमानात ते एकटेच प्रवासी आहेत. म्हणजे जणू काही त्यांच्यासाठी एअर इंडियाच्या इंटरनॅशनल विभागाने फ्लाईट पाठवलं आहे, असंच त्यांना वाटलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी त्यांनी याबद्दल संवाद साधल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. ओबेरॉय म्हणाले, ‘ मी 23 जूनला पहाटे 4 वाजता एअर इंडियाच्या (AI-929) या विमानाने अमृतसरहून दुबईला निघालो होतो. मी इतका नशीबवान आहे की, संपूर्ण विमानात मी एकटाच प्रवासी होतो. या प्रवासात मी एखाद्या राज्याचा किंवा संस्थानचा महाराजा असल्यासारखं मला वाटलं.’ हेही वाचा- डेल्टा+ व्हेरिएंटचा वाढता धोका, राज्य सरकारकडून निर्बंधासंदर्भातले नवे आदेश जारी ओबेरॉय यांचा दुबईत व्यवसाय असून त्यांच्याकडे 10 वर्षांचा गोल्डन व्हिसा आहे. त्यांनी तीन-चार तासांच्या प्रवासाचं तिकिट 750 दिरामना विकत घेतलं होतं. ते म्हणाले, ‘ एअर इंडियाच्या क्रूने (Air India crew) मला खूपच चांगली वागणूक दिली. मी विमानात फोटो काढले तसंच विमानाचे वैमानिक आणि क्रू यांच्यासोबतही मी फोटो काढले. मला जर पुन्हा एकट्याने विमान प्रवास करायची संधी मिळाली तर मी त्याला नकार देईन. कारण उभ्या आयुष्यात एकदा कधीतरी असा प्रवास करायला बरं वाटतं. प्रवास खूप कंटाळवाणा होतो. वेळ घालवण्यासाठी मी विमानातली आसनं आणि खिडक्या मोजल्या.’ पहिल्यांदा ओबेरॉय यांना विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. पण नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दखल दिल्यानंतर एअर इंडियाने त्यांना विमान प्रवासाची परवानगी दिली. ते म्हणाले, ‘दुबईच्या पूर्ण व्हॅक्सिनेशन प्रमाणपत्रासह विमान प्रवासासाठीची सर्व कागदपत्र मी सोबत घेतली होती. हरदीपसिंग पुरींच्या मंत्रालयाने मदत केल्यानंतर अखेर मी विमानात बसू शकलो.’ हेही वाचा- पुण्यातील आजच्या बैठकीला अजित पवार Absent का?, राजकीय वर्तुळात चर्चा हा प्रश्न निकाली निघाल्यावर पायलट आणि विमानातील क्रूने सिंग यांचा हा विलक्षण अनुभव अविस्मरणीय व्हावा यासाठी सर्व योग्य ती सेवा दिली. विमानात फोटो काढणं आणि सिंग यांना उडत्या विमानात इकडे-तिकडे जायला परवानगी देण्यात आली होती. जेणेकरून ते एकट्याने प्रवासाचा आनंद (Lonely travel) लुटू शकतील, असं एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published: