मराठी बातम्या /बातम्या /देश /

ट्विटर VS सरकार वॉर! रविशंकर प्रसाद म्हणातात- डिजिटल सार्वभौमत्त्वाशी तडजोड नाही, वाचा काय आहे नेमका वाद

ट्विटर VS सरकार वॉर! रविशंकर प्रसाद म्हणातात- डिजिटल सार्वभौमत्त्वाशी तडजोड नाही, वाचा काय आहे नेमका वाद

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर VS केंद्र सरकार असं वॉर पाहायला मिळतं आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणतात की भारत डिजिटल सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर VS केंद्र सरकार असं वॉर पाहायला मिळतं आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणतात की भारत डिजिटल सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर VS केंद्र सरकार असं वॉर पाहायला मिळतं आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणतात की भारत डिजिटल सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मारिया शकिल, नवी दिल्ली, 29 मे: गेल्या काही दिवसांपासून ट्विटर VS केंद्र सरकार (Twitter Vs Government) असं वॉर पाहायला मिळतं आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणतात की भारत डिजिटल सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. सोशल मीडिया आणि ट्विटर वादाच्या नवीन आयटी नियमांबद्दल न्यूज 18 शी खास संभाषणात ते म्हणाले आहेत - बड्या सोशल मीडिया कंपन्या भारताकडून मोठा नफा कमावतात. त्याची देशात मोठी उपस्थिती आहे. अगदी सामान्य नागरिक, पत्रकार, उद्योजक यांना सर्रास ट्रोल केले जाते. आम्ही गोपनीयतेचा आदर करतो. परंतु कंपन्यांना दहशतवादी कारवाया, समाजकंटक, देशद्रोही कारवायांशी संबंधित माहिती द्यावी लागेल.

रविशंकर प्रसाद म्हणाले की टीका कुणीही करू शकतो, हा आपल्या लोकशाहीचा एक भाग आहे. पण कायदा सर्वात आधी आहे. भारत आपल्या डिजिटल सार्वभौमत्वाशी कोणत्याही प्रकारे तडजोड करू शकत नाही. भारत ही राज्यघटनेनुसार चालणारी लोकशाही आहे

'काही लोकं ट्विटरवर राजकारण करतात, आता ते ट्विटरसह मिळून राजकारण करत आहेत'

त्यांनी असं म्हटलं आहे की भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे. या कंपन्यांना भारतीय संविधानाचा आदर करणे शिकायला हवं.  काही लोकं ट्विटरवर राजकारण करतात, आता ते ट्विटरसह मिळून राजकारण करत आहेत. WhatsApp बाबत बोलताना ते म्हणाले की, सर्व युजर्ना संपूर्ण स्वातंत्र्य आहे की ते पूर्वीप्रमाणेच या प्लॅटफॉर्मचा वापर करतील. त्यांचा कंटेट डिस्क्लोज करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे.

हे वाचा-GDP 8 टक्के घट होण्याचा अंदाज; देशांतर्गत शेअरमार्केटवर परिणाम होण्याची धास्ती

'आमचा तंत्रज्ञानावर विश्वास'

त्यांनी असं म्हटलं आहे की डिजिटल इंडियाची प्रशंसा संपूर्ण जगाने केली आहे. कोणत्याही भारतीयाच्या संमतीच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे. आमचा तंत्रज्ञानावर विश्वास आहे. आम्ही सत्तेत सोशल मीडियाच्या मोठ्या कंपन्यांमुळे आलो नाही आहोत. आम्ही सत्तेत आहोत कारण भारतीय जनतेने आमच्यावर विश्वास दर्शविला आहे.

ट्विटर-केंद्र सरकारमध्ये वाद 

-कथित 'टूलकिट' प्रकरणी ट्विटर ऑफिसवरील छापेमारीनंतर ट्विटरने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली होती. दिल्ली, गुरुग्राम येथील कार्यालयांमध्ये नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर भारतातील कर्मचाऱ्यांची मोठी चिंता असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे. त्यावर हे कर्मचारी सुरक्षित असल्याचं सरकारने स्पष्ट केलं होत.

हे वाचा-भारतीय कर्मचाऱ्यांबाबत चिंता,Twitterच्या ऑफिसवर छापेमारीनंतर कंपनीची प्रतिक्रिया

-कंपनीने असा आरोप केला होता की या कर्मचाऱ्यांना भीती घातली जात आहे आहे, हा आरोप देखील सरकारने फेटाळला आहे. हा आरोप खोटा आणि आधारहीन असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

-ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारतात सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची रक्षा करण्याची जबाबदारी केवळ ट्विटरने घेतलेली नाही असा टोला सरकारकडून लगावण्यात आला होता.

-ट्विटरचं असं म्हणणं आहे त्यांच्याद्वारे वैश्विक सेवा नियमांचं पालन केलं जात आहे. दरम्यान सरकारचं असं म्हणणं आहे की जर भारतात कंपनी काम करतेय तर भारतातील कायदे लागू होतील. ट्विटरला त्यांचे नियम भारतावर थोपवायचे आहेत.

First published:

Tags: Twitter, Twitter debate, Twitter War