नवी दिल्ली, 29 मे : शेअर बाजारात सध्या असलेली तेजी पोकळ ठरू शकते का आणि बाजार धाडकन कोसळणार का, अशी धास्ती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या (GDP) अंदाजानंतरही शेअर बाजारातली तेजी कायम राहिली. त्यामुळे ही तेजी बुडबुडा तर ठरणार नाही ना अशी धास्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्यक्त केली आहे. शेअर बाजारावर (Share market latest) भीतीचं सावट आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात आरबीआयनं म्हटले आहे की, 2020-21 मध्ये देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) आठ टक्के घट होण्याचा अंदाज असून यामुळं देशांतर्गत शेअर बाजारावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात अजून बाजार तेजीत आहे. त्यामुळे ही तेजी वरवरची किंवा कृत्रिम असण्याची शक्यता आहे. आरबीआयनं म्हटलं आहे, की देशातील शेअर्सचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. 21 जानेवारी 2021 रोजी बेंचमार्क इंडेक्सने 50,000 अंकांची पातळी ओलांडली आणि 15 फेब्रुवारी रोजी तर 52,154 अंकांची उच्च पातळी गाठली होती. त्याच बरोबर 2020-21 मध्ये सेन्सेक्समध्ये सुमारे 68 टक्के वाढ झाली आहे. सन 2020-21 मध्ये जीडीपीमध्ये 8 टक्के घसरण झाल्याचा अंदाज पाहता अशा परिस्थितीत मालमत्ता मूल्याच्या महागाईमुळं ही परिस्थिती जोखीम निर्माण करणारी ठरू शकते. हे वाचा - HDFC बँकेला मोठा दणका; RBI ने ठोठावला 10 कोटी रुपयांचा दंड रिझर्व बँकेनं सांगितले की, शेअर बाजार मुख्यत्वे मुद्रा प्रसार आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) गुंतवणुकीमुळं चालत असतात. यासह देशात घडणाऱ्या आर्थिक घडामोडी शेअर बाजाराच्या प्रॉस्पेक्टवर प्रभाव पाडत असतात. परंतु त्यांचा थेट परिणाम पैशाच्या पुरवठा आणि एफपीआयवर कमी होत आहे. व्याज दर आणि इक्विटी जोखीम प्रीमियममध्ये कपात करणे हे 2016 ते 2020 पर्यंतच्या शेअर किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण असल्याचे केंद्रीय बँकेनं (RBI) म्हटलं आहे. यासह, भविष्यात मिळकत होण्याच्या अपेक्षेनेही यात मोठ्या प्रमाणात योगदान मिळण्याची शक्यता आहे. हे वाचा - सरकारचे मौन अधिकच गंभीर! जालन्यातील मारहाणीच्या व्हिडिओनंतर फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मधल्या काळात केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजारात चांगली वाढ झाली होती. त्यानंतर कोरोना लस येत असल्यानं आणि कोरोना रुग्णसंख्या सातत्यांनं कमी होत गेल्यानं शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला होता. त्यामुळं गुंतवणुकदार चांगलेच मालामाल झाले होते. म्युच्युअर फंडातून गुंतवणूक करणाऱ्यांनाही बाजार सातत्यानं उसळी घेत असल्यानं चांगला परतावा मिळाला, मात्र आता आरबीआयला शेअर बाजारातील घसरणीची काळजी सतातवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.