नवी दिल्ली 28 ऑगस्ट : नोएडामधील ट्विन टॉवर आता बरखास्त करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी अवघ्या 9 सेकंदात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. एवढी मोठी इमारत पाडण्याची ही देशातील दुसरी घटना आहे. एवढी मोठी इमारत पाडण्याचं मोठं आव्हान देखील प्रशासनासमोर आहे. त्यामुळे या घटनेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. ही इमारत पाडताना लाईव्ह व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता. एक दोन नाही तर जगात ‘ट्विन टॉवर’सारखा 8 वेळा आलाय ‘भूकंप’, 9 सेंकदात पत्त्यासारखी कोसळली इमारत मुंबईस्थित एडफिस इंजिनीअरिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या भागीदार जेट डिमॉलिशनने शनिवारी दोन्ही टॉवर पाडण्यासाठी सर्व तयारी केली आहे. 32 मजली एपेक्स (100 मीटर) आणि 29 मजली सियान (97 मीटर) टॉवर 3700 किलो स्फोटके बसवून तारांना जोडण्यात आले आहेत. मुख्य वायर एका बटणाशी जोडलेली असते, जे दुरून दाबल्यावर स्फोट होईल आणि ट्विन टॉवर 9-15 सेकंदात जमीनदोस्त होतील. खबरदारी म्हणून आजूबाजूचे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
टॉवरमधील स्फोटकांचा स्फोट करण्यासाठी 100 मीटर अंतरावर नियंत्रण कक्षात एक स्विच करण्यात आलं आहे. याठिकाणी फक्त 6 लोक असतील. याशिवाय 500 मीटरच्या परिघात कोणालाही येऊ दिले जाणार नाही. मीडियादेखील इमारतीपासून 600 मीटर अंतरावर राहील. Countdown सुरू! ट्विन टॉवर्सचा ग्राऊंड रिपोर्ट, पाहा व्हिडीओ टॉवरचा स्फोट करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केला जाणार आहे. आयपीएस एस राजेश यांना ट्विन टॉवर ब्लास्टचे इन्सिडेंट कमांडर बनवण्यात आले आहे, ते मोबाईल कंट्रोल रूममध्ये बसून सर्व परिस्थिती आणि हालचालींवर लक्ष ठेवतील. एस राजेश यांनी हिरवा सिग्नल दिल्यानंतरच ट्विन टॉवर्सचा स्फोट होणार आहे. म्हणजेच एस राजेश यांच्या इशाऱ्यानंतर 32 मजली इमारत पाडण्यात येणार आहे.