नोएडा: नोएडामधील ट्विन टॉवर आता बरखास्त करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून तयारी पूर्ण झाली आहे. हा टॉवर पाडण्यासाठी १७ कोटी रुपयांचा जवळपास खर्च येणार आहे. एवढी मोठी इमारत पाडण्याची ही देशातील दुसरी घटना आहे. एवढी मोठी इमारत पाडण्याचं मोठं आव्हान देखील प्रशासनासमोर आहे.
ट्विन टॉवर परिसरातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जेव्हा ही इमारत पाडण्यात येईल त्यावेळी ६ लोक १०० मीटर अंतरावर उपस्थित असणार आहे.
९ सेकंदात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. ही इमारत बरखास्त केल्यानंतर त्यातून निघालेला ढिगारा हटवण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या टॉवरमधील लोखंड जे मिळेल ते वाकून त्याचे पैसे घेण्यात येणार आहेत.
ट्विन टॉवर पाडण्यात सर्वसामान्य नागरिकांना मोठं यश मिळालं आहे. कारण यासाठी त्यांना बिल्डर विरोधात तक्रार केली होती. भ्रष्टाचार आणि नियमांचं उल्लंघन करून हा टॉवर बांधण्यात आला होता. आता हा टॉवर बरखास्त करण्यात येणार आहे.
ही इमारत तयार करण्यासाठी ८०० कोटी रुपये लागले होते. आज दुपारी २.३० वाजता हा टॉवर पाडण्यात येणार आहे. यासाठी खास कंट्रोल रूम देखील तयार करण्यात आले आहेत. आजूबाजूच्या परिसरात तीन रुग्णालय आहेत. तिथले ३०० बेड रिझर्व्ह करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.